फक्त 2 दिवस… 12 व्हिडियो अन् 32 मिलियन सब्सक्राइबर्स, YouTube धमका करणारा कोण आहे हा व्यक्ती?

Cristiano Ronaldo: रोनाल्डोने आपल्या खेळाने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता सोशल मीडियावर आपले स्थान निर्माण केले आहे. इंस्टाग्रामवर रोनाल्डो यापूर्वीपासून आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वाधिक फॉलोअर्स त्याचे आहे.

फक्त 2 दिवस... 12 व्हिडियो अन् 32 मिलियन सब्सक्राइबर्स, YouTube धमका करणारा कोण आहे हा व्यक्ती?
Cristiano Ronaldo
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 6:09 PM

Cristiano Ronaldo : फुटबॉलच्या मैदानावर अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित करणारा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन विक्रम केला आहे. त्याने यूट्यूबवर पदार्पण केले आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्म धमका उडवून दिला आहे. या दिग्गज फुटबॉलपटूने यूट्यूबच्या जगात प्रवेश केल्यानंतर एका दिवसात सर्व रेकॉर्ड मोडले. पोर्तुगीज फुटबॉलपटू ‘यूआर -क्रिस्टियानो’ याने त्याचे नवीन यू ट्यूब चॅनल लॉन्च केले. त्यानंतर त्याने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले. फुटबॉलच्या मैदानाप्रमाणे सोशल मीडियाच्या मैदानावर विक्रम आपल्या नावावर नोंदवले.

अनेक नवीन विक्रम

क्रिस्टियानो रोनाल्डोने यूट्यूबच्या दुनियेत पदार्पण धमकेदार झाले आहे. रोनाल्डोने गेल्या दोन दिवसांत त्याच्या यूट्यूब चॅनलवर 12 व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओंवर युजर्सकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहेत. दोन दिवसांत 32 दशलक्ष लोकांनी रोनाल्डो याच्या चॅनलला सबस्क्राइब केले गेले आहे. त्याच वेळी, त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. त्याच्या तीन व्हिडिओंना आतापर्यंत 20 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनलच्या एकूण व्ह्यूजबद्दल बोलायचे झाले तर तो शंभर दशलक्ष ओलांडला आहे. एका दिवसात सर्वाधिक सबस्क्राइबर्सपासून ते सर्वाधिक व्ह्यूजपर्यंतचे अनेक रेकॉर्ड त्याने मोडले आहेत.

हे सुद्धा वाचा

यूट्यूबकडून गोल्ड प्ले बटण

थिंकफिकच्या अहवालानुसार, यूट्यूब चॅनेल प्रत्येक 1000 व्ह्यूजसाठी US$6 मिळतात. तसेच प्रत्येक 10 लाख व्ह्यूजसाठी US$1200 ते US$6000 दरम्यान रक्कम मिळते. त्यानुसार रोनाल्डोच्या चॅनलची दोन दिवसांची कमाई पाहिली करोडोंमध्ये आहे. आता तर रोनाल्डोने यूट्यूबवर 100 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पासुद्धा ओलांडला आहे. यामुळे त्याला यूट्यूबकडून गोल्ड प्ले बटण देखील मिळाले आहे. तो व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर देखील शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवर पूर्वीपासून प्रसिद्ध

रोनाल्डोने आपल्या खेळाने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता सोशल मीडियावर आपले स्थान निर्माण केले आहे. इंस्टाग्रामवर रोनाल्डो यापूर्वीपासून आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वाधिक फॉलोअर्स त्याचे आहे. त्याला 676 दशलक्ष लोकांनी इंस्टावर फॉलो केले आहे. रोनाल्डो याने 2023-24 हंगामात सौदी प्रो लीग क्लब अल नासरसाठी 44 गोल केले. युरो 2024 मध्ये खराब कामगिरी असूनही, जिथे तो एकही गोल करू शकला नाही. रोनाल्डोने 2024-25 च्या हंगामाची सुरुवात तीन सामन्यांत तीन गोल करून केली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.