Video | तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला, जबड्यात पकडून पाण्यात नेण्याचा प्रयत्न, पाहा थरारक व्हिडीओ

सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या कळपावर एका मगरीने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ अतिशय थरारक आहे.

Video | तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला, जबड्यात पकडून पाण्यात नेण्याचा प्रयत्न, पाहा थरारक व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 4:34 PM

मुंबई : जंगलातील दुनियेचं सगळ्यांनाच आकर्षण असतं. जंगलातील प्राणी कसे जगत असतील ? छोट्या प्राण्यांवर इतर प्राणी कसे हल्ला करतात ? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. याच उत्सुकतेपोटी प्राण्यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या कळपावर एका मगरीने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ अतिशय थरारक आहे. (Crocodile attack on Elephant video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका जंगलातील असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप दिसतोय. यामध्ये काही छोटे तर काही मोठे हत्ती आहेत. हे सर्व हत्ती एका नदीच्या काठावर जाऊन पाणी पित आहेत. मात्र, याच वेळी या हत्तींपैकी एका छोट्या हत्तीवर पाण्यातील मगरीने हल्ला केला आहे. या मगरीने आपल्या जबड्यामध्ये हत्तीला पकडले आहे. मगर हत्तीची सोंड आपल्या जबड्यामध्ये पकडून त्याला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हत्ती बलशाली असल्यामुळे तो मगरीला दात देत नाहीये.

मोठा हत्ती आला अन् प्राण वाचला

हा प्रकार अचानकपणे घडल्यामुळे व्हिडीओतील हत्तींचा कळप बिथरून गेला आहे. व्हिडीओतील हत्ती मोठ्याने ओरडत असल्याचे आपल्याला दिसत आहेत. तसेच यावेळी कळपातील एक मोठा आणि समजूतदार हत्ती मगरीकडे धावून गेल्याचेही आपल्याला दिसतेय. या मोठ्या हत्तीने छोट्या हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न शेवटी यशस्वी झाला असून छोटा हत्ती मगरीच्या तावडीतून सुटला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ शोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, हा व्हिडीओ कोणत्या जंगलातील आणि कुठला आहे ? हे निश्चितपणे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला आयआरएस ऑफिसर अंकुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Viral Video: मोर छतावर आला अन् अचानकपणे फुलविला पिसारा, पाहा नयनरम्य व्हिडीओ

VIDEO : कपड्यांचा दुकानदार इतका का नाचतोय? पण भारी नाचतोय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

VIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात

(Crocodile attack on Elephant video goes viral on social media)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.