AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मगरही सपशेल फेल! तोंडात पकडलेली शिकार सहज बाहेर पडून निघून जाते, पाहा Viral video

Crocodile shocking video : मगरीच्या शिकारीचा एक धक्कादायक (Shocking) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. मगरीने एका छोट्या कासवाची शिकार केली आहे आणि ती त्याला खाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ती त्यात अपयशी ठरते.

मगरही सपशेल फेल! तोंडात पकडलेली शिकार सहज बाहेर पडून निघून जाते, पाहा Viral video
मगरीच्या तावडीतून सहज सुटका करून घेतं कासवImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 10:56 AM

Crocodile shocking video : सिंहाला जसं जंगलाचा राजा म्हटलं जातं, तसंच मगरींनाही ‘पाण्याचा राजा’ म्हटलं जातं. शिकारीच्या बाबतीत त्या सिंहांपेक्षा अजिबात कमी नाहीत. ते आपल्या भक्ष्यावर अशा रितीने वार करतात, की त्यांच्या तावडीतून सुटणे कठीण असते. मगरी पाण्यात असतील तर काही वेळा ते सिंहांना आपला शिकार बनवतात. कोणत्याही शिकारीला त्यांच्या तीक्ष्ण दातांमधून सुटणे फार कठीण असते. याशिवाय, त्या इतक्या मोठ्या असतात, की त्यांचे शिकार लहान असल्यास त्या थेट गिळतात. मगरीच्या शिकारीचा एक धक्कादायक (Shocking) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये मगरीने एका छोट्या कासवाची शिकार केली आहे आणि ती त्याला खाण्याचा आणि गिळण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ती त्यात अपयशी ठरते. कारण कासवाच्या पाठीवरील दगडासारखे कवच कासवाला मगरीच्या तीक्ष्ण दातांपासून वाचवते.

कासव निघून जाते

मदर खूप प्रयत्न करते, पण जेव्हा तिला वाटतं की ती कासवाला इजा करू शकत नाही, तेव्हा ती त्याला सोडून देतो. मगरीच्या तावडीतून सुटल्यानंतर कासवही हळू चालते आणि तिथून निघून जाते. शिकारीच्या बाबतीत मगरीला असे अपयशी ठरलेले तुम्ही क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे, हे पाहून तुम्हालाही आधी वाटेल की मगर त्या कासवाला खाऊन टाकेल, पण शेवटी गडबड होते, ज्याची अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर scienceturkiyeofficial नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 54 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की ‘ईश्वरविहीन मगरमच्छ विश्वास करने वाले कछुए को हरा नहीं सका’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की अखेर कासवाची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.

आणखी वाचा :

Viral video : मुलीला Impress करण्याच्या नादात होतं ‘असं’ काही, की पुन्हा कधीही करणार नाही धाडस

Magic pencil मिळाल्यावर काय करतो हा मुलगा? पाहा Interesting viral video

Fitness video : आहे तर चिमुरडा पण कसा उडवतो ‘बार’? तुम्हालाही प्रोत्साहित करेल

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.