मुंबई : हरीण प्रचंड चपळ प्राणी आहे, असं म्हटलं जातं. हरीण खूप वेगाने धावतं. त्यामुळे ते सहजासहज वाघ, सिंहांच्या हाती लागत नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मगरीन हरणीची शिकार कशाप्रकारे करते हे स्पष्टपणे दिसत आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे (Crocodile hunted deer in water viral video).
संबंधित व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुस्वामी यांनी शेअर केला आहे. “धैर्य आणि मूर्खपणा यांच्यात एक पातळ रेषा आहे आणि ती कधीही ओलांडू नका”, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटीझन्सनी प्रतिक्रिया दिली आहे (Crocodile hunted deer in water viral video).
व्हिडीओत नेमकं काय?
व्हिडीओत एक हरीण बेटावर उभी आहे. या बेटाच्या चारही बाजूला पाणी आहे. हरणीला बघून पाण्यातील एक मगरीन बेटाच्या किनाऱ्यावर दबा धरुन बसते. ती हरीणच्या शिकारासाठी अत्यंत शांतपणे पुढे सरकते. मात्र, यावेळी हरणीला मगरीनची चाहूल लागते. ते हरीण थेट पाण्यात उडी मारते आणि पोहत किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, तेवढ्यात मगरीन तिच्या पाठीमागे सूटतं. यावेळी दुसरी आणखी एक मगरीन तिच्या दिशेला धावते. या दोघी मगरीनच्या पेचात हरीण अडकतं आणि एक मगरीन त्या हरणीला जबड्यात घेत गिळून घेतं. हा सर्व थरार कॅमऱ्यात जसाचा तसा कैद झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे त्याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
There’s a fine line between bravery & stupidity, which should never be crossed. #LookBeforeYouLeap pic.twitter.com/rMDc3rdNiD
— Praveen Angusamy, IFS ? (@PraveenIFShere) March 7, 2021