सेकंदाचा उशीर झाला असता तरी गेला असता जीव, महिला गार्डनं कसं वाचवलं मुलाला? पाहा थरारक Video
Hero police officer : सेसिल काउंटी (Cecil County), मेरीलँडमधील एका क्रॉसिंग गार्डवर एक अंगावर काटा आणणारी घटना घडलीय. दुसऱ्याचा जीव वाचवत असल्याचे व्हिडिओ फुटेज (Footage) समोर आल्यानंतर अॅनेट गुडीयर (Annette Goodyear) यांना गव्हर्नरचे प्रशस्तिपत्र देण्यात आले
Hero police officer : सेसिल काउंटी (Cecil County), मेरीलँडमधील एका क्रॉसिंग गार्डवर एक अंगावर काटा आणणारी घटना घडलीय. समोरून येणाऱ्या कारमधून विद्यार्थ्याला येथील गार्डने अत्यंत नाट्यमयरित्या वाचवले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालत दुसऱ्याचा जीव वाचवत असल्याचे व्हिडिओ फुटेज (Footage) समोर आल्यानंतर अॅनेट गुडीयर (Annette Goodyear) यांना गव्हर्नरचे प्रशस्तिपत्र देण्यात आले आहे. एनबीसी वॉशिंग्टनच्या वृत्तानुसार, 4 फेब्रुवारी रोजी नॉर्थ ईस्ट मिडल स्कूलजवळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणार्या एका शाळेच्या विद्यार्थ्याला वाचवताना अॅनेट गुडीयर (Annette Goodyear) व्हिडिओमध्ये दिसत आहे. सेसिल काउंटीच्या अधिकार्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गुडीअर तिच्या हाताने “थांबा” असा सिग्नल देत असल्याचे दिसत आहे. कारण काळी सेडान ती आणि विद्यार्थिनी दोघांच्याही जवळ येत असते.
पोलीस अधिकारी म्हणून करतात काम
कार थांबत नाही आणि गुडीयर, ज्या पोलीस अधिकारी म्हणून काम करतात. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला त्याच्या मार्गावरून ढकलताना दिसतात. केशरी कपडे परिधान केलेल्या गुडीअरला वेगवान कारने धडक दिली आणि जमिनीवर पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विद्यार्थ्याला कोणतीही इजा झाली नाही.
This is what hero police officers do! North East Police Officer Annette Goodyear saved a student from harm’s way early this morning. pic.twitter.com/efpgjqucuO
— Dr. Jeffrey Lawson (@DrJalawson) February 4, 2022
कामावरही परतल्या
खबरदारी म्हणून गुडीयर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि नंतर सोडण्यातही आले. एनबीसी वॉशिंग्टननुसार शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या संबंधित विद्यार्थ्याच्या घरीही गेल्या, असे मीडिया आउटलेटने सांगितले. सेसिल काउंटी पब्लिक स्कूलचे अधीक्षक जेफ्री लॉसन यांनी ट्विटरवर सांगितले, की या घटनेनंतर गुडीअर लवकरच त्यांच्या कामावर परतल्या. त्यांच्या या धाडसी कामासाठी गव्हर्नरचे प्रशस्तिपत्र देण्यात येत आहे, असे मेरीलँडचे गव्हर्नर लॅरी होगन यांनी सोमवारी सांगितले.
Thanks again Officer Goodyear! Back to work already after being hit by a car! HERO! pic.twitter.com/J6UjvWmIGn
— Dr. Jeffrey Lawson (@DrJalawson) February 8, 2022
आणखी वाचा :