भावनेच्या भरात हॉटेलात इतकी जास्त टीप देऊन बसला की बास्स…! खरा ट्विस्ट तर पुढे…
हॉटेलमध्ये जाऊन या व्यक्तीने इतकी जास्त टीप दिली आहे की वाचून तुम्हाला धक्का बसेल. कुणीही टीप देताना विचार करतो नाही का? हा किस्सा वाचा नेमकं झालं काय...
“टिप्स फॉर जिझस” अशी एक मोहीम सध्या परदेशात चालू आहे. या मोहिमेत लोकं हॉटेल मधल्या स्टाफला, वेटरला टीप देतात. ती रक्कम कितीही असू शकते. पण मोहीम सुरु असल्यानं यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन, दिलदार होऊन लोकं चांगलीच टीप देऊ करतायत. पण या मोहिमेच्या नादी लागून एक कहर झालाय. हा किस्सा प्रचंड व्हायरल झालाय. हॉटेलमध्ये जाऊन या व्यक्तीने इतकी जास्त टीप दिली आहे की वाचून तुम्हाला धक्का बसेल. कुणीही टीप देताना विचार करतो नाही का? हा किस्सा वाचा नेमकं झालं काय…
अनेकदा लोक रेस्टॉरंट किंवा हॉटेल्समध्ये जातात, ते वेटरच्या चांगल्या सेवेसाठी टिप्सही देतात. काही लोक टीप म्हणून मोठी रक्कम देतात, वेटर पण जाम खुश होतो.
“टिप्स फॉर जिझस” या ऑनलाईन कॅम्पेनवर लोक रेस्टॉरंटमध्ये जाऊन मोठी रक्कम देऊन वेटर किंवा स्टाफला खूश करत आहेत.
एक अशी घटना घडली आहे की, ज्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एक व्यक्ती जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये आली आणि त्याने चक्क दोन लाख रुपयांची टीप दिली. जेवणाचं बिल झालं होतं एक हजार रुपये! टीप कितीची दिली? 2 लाख!
Mirror.com बातमीनुसार, अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये अल्फ्रेडो कॅफे नावाची एक जागा आहे, जिथे मारियाना लॅम्बर्ट नावाची एक महिला वेटर काम करते. तिला ही टीप देण्यात आली.
तीन महिन्यांपूर्वी एक व्यक्ती कॅफेत आला, त्याने एक हजार रुपयांचे जेवण केले. तिथून निघताना त्याने रेस्टॉरंटला दोन लाख रुपयांची टीप दिली. हे ऐकून वेटरला खूप आश्चर्य वाटले.
त्यावेळी या एरिक स्मिथ नावाच्या व्यक्तीने आपण “टिप्स फॉर जिझस” या मोहिमेने प्रभावित होऊन असा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
पण दोन महिन्यांनी या वेटरला काय, संपूर्ण रेस्टॉरंटला धक्का बसला. एरिक स्मिथने गेल्या महिन्यात रेस्टॉरंटला एक पत्र पाठवले आणि त्याने आपले पैसे परत करण्यासाठी पत्र लिहिले.
क्रेडिट कार्डच्या चार्ज बॅक नियमांतर्गत पैसे काढण्याचा दावा दाखल केला. रेस्टॉरंटने स्मिथशी फेसबुकवर बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता हा गुन्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करण्यात आला आहे. निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.