हे छोटसं बाळ पडलं डॉक्टरच्या प्रेमात! हावभाव तर बघा
लोकांना व्हिडीओ मधल्या या लहान मुलाचा निरागसपणा आणि डोळे आवडलेत. हा क्यूट मुलगा डॉक्टरकडे गेला होता. अर्थात त्याचे आईवडील त्याला घेऊन गेले असतील.
इंटरनेटवर बरेच व्हिडिओ आहेत. लहान मुलांचे, कुणाच्या लग्नातले, प्रॅन्क व्हिडीओ, डान्स व्हिडीओ. अशा अनेक क्लिप्स इथे उपलब्ध असतात ज्या कितीही वेळा पाहिल्या तरी आपल्याला कंटाळा येत नाही. हा व्हिडिओ काहीसा असाच आहे, जो पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओच्या प्रेमात पडलेत. लोकांना व्हिडीओ मधल्या या लहान मुलाचा निरागसपणा आणि डोळे आवडलेत. हा क्यूट मुलगा डॉक्टरकडे गेला होता. अर्थात त्याचे आईवडील त्याला घेऊन गेले असतील. जेव्हा त्याचं चेकअप सुरु होतं तेव्हा त्याने असे हावभाव दिले की इंटरनेटवरील जनता प्रेमात पडली.
चेकअप सुरु असताना आधी हे बाळ शांत बसून असतं इतका निरागस चेहरा तुम्ही कधीच पाहिला नसेल. शांतपणे तो डॉक्टरकडे बघत असतो. बघतो बघतो आणि अचानक हसतो. हे कॅमेऱ्यात कैद झालंय.
मुलाची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्स म्हणाले की, तो ज्या प्रकारे लेडी डॉक्टरकडे पाहत आहे ते खरोखरच हृदयस्पर्शी आहे! जर तुम्हालाही हा गोंडस व्हिडीओ पाहायचा असेल तर या क्लिपवर झटपट नजर टाका, तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येईल.
हा क्यूट व्हिडिओ @Gabriele_Corno या ट्विटर युजरने 9 फेब्रुवारी रोजी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान हे मूल प्रेमात पडले!
This child falls in love during the examination with doctor pic.twitter.com/bVyk7qxx8w
— Gabriele Corno (@Gabriele_Corno) February 9, 2023
या क्लिपला 2 लाख 68 हजारहून अधिक व्ह्यूज, 17 हजारहून अधिक लाईक्स आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही युजर्स ने लिहिलं – “यह बहुत क्यूट वीडियो है।” काहींनी लिहिले की, या क्लिपने “आपला दिवस बनवला.” तर काहींनी लिहिले की, “मुलाचा निरागसपणा मन जिंकत आहे.”