कुत्रं असावं तर असं! संस्कारी कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल
हा प्राणी आपल्या बुद्धिमत्तेने लोकांना आश्चर्यचकित करतो, तर काहींमध्ये तो आपल्या गोंडस अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकतो. सध्या कुत्र्याच्या अशाच एका व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. यात कुत्रा घरात शिरताच असं काहीतरी करतो, जे पाहून तुम्हीही म्हणाल- 'हा कुत्रा खूप सुसंस्कृत आहे'.
मुंबई: सोशल मीडियावर कुत्र्यांशी संबंधित अनेक गोंडस व्हिडिओ असतात. यातील काही व्हिडिओंमध्ये हा प्राणी आपल्या बुद्धिमत्तेने लोकांना आश्चर्यचकित करतो, तर काहींमध्ये तो आपल्या गोंडस अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकतो. सध्या कुत्र्याच्या अशाच एका व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. यात कुत्रा घरात शिरताच असं काहीतरी करतो, जे पाहून तुम्हीही म्हणाल- ‘हा कुत्रा खूप सुसंस्कृत आहे’.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये घराच्या दाराबाहेर एक पिल्लू उभं असल्याचं दिसत आहे. कुत्रा आपल्या मालकाला आत जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा इशारा करतो. यानंतर मालकाने गेट उघडताच कुत्र्याची पुढची गोष्ट पाहण्यासारखी असते. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दरवाजातून कुत्रा आत आल्यावर तो आधी तिथे ठेवलेल्या चटईवर आपले घाणेरडे पाय पुसतो. मग पुढे येतो. आता हा व्हिडिओ पाहून लोक या कुत्र्याला ‘सुसंस्कृत’ म्हणत आहेत. तसेही म्हणावे लागेल. कारण, आपण या कुत्र्याइतके शिस्तबद्ध नाही.
‘संस्कारी’ कुत्र्याचा हा व्हिडिओ @Figensport ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “बहुतेक लोकांपेक्षा याला स्वच्छता जास्त आवडते.” काही सेकंदाच्या या क्लिपला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय लोक प्रचंड लाइक आणि कमेंटही करत आहेत.
It is cleaner than most people. ? pic.twitter.com/cBVUP4vKgZ
— The Best (@Figensport) May 18, 2023
I think sometimes animals are better than people
— Kristine Parker☔️ (@KristineParkerH) May 18, 2023
The cleanest dog in the entire history of the Earth and our galaxy ?. Greetings!
— Realidad Distópica (@RDistopica) May 19, 2023
Good habits must be taught early on
— TwixBixby1 (@TBixby1) May 19, 2023
He’s so polite and so endearing. ??????
— Rona (@Rona84385014083) May 19, 2023