वय वर्षे 1, वर्ल्ड रेकॉर्ड 3, देशाची राजधानी आणि ध्वज ओळखण्यात नंबर एक!, चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून लोक अवाक…
मध्यप्रदेशातील रीवा इथे राहणाऱ्या यशस्वी मिश्राने अवघ्या 1 वर्ष 4 महिन्यांच्या वयात वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 'लिटल गुगल बॉय' या नावाने सध्या तिला ओळखलं जाऊ लागलं आहे.
मुंबई : एका वर्षाचं लहान मुल काय करू शकतं? याचं सर्वसामान्य उत्तर त्याच्या बालपणाला अनुसरून तो वागेल. तो हळूहळू बोलायला लागेल. त्याचं बालपण इन्जॉय करेल. पण काहीजण या सगळ्याला अपवाद असतात. अश्याच एका चिमुकल्याची गोष्ट सध्या व्हायरल (viral News) होत आहे. या चिमुकल्याच्या नावावर चक्क तीन वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. मध्यप्रदेशातील रीवा इथे राहणाऱ्या यशस्वी मिश्राने अवघ्या 1 वर्ष 4 महिन्यांच्या वयात वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यशस्वीने एक वर्ष वयात एवढी प्रगल्भता दाखवली आहे. जी भल्या भल्यांना जमणार नाही. ‘लिटल गुगल बॉय’ (Little Google Boy) या नावाने सध्या तिला ओळखलं जाऊ लागलं आहे.
रेकॉर्ड काय आहे?
यशस्वीने एक वर्ष आणि चार महिन्याच्या वयात 195 देशांची आणि त्यांच्या राजधान्यांची नावे लक्षात ठेवून विश्वविक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञानाची, प्रगल्भतेची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.पण यशस्वीने असा विक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी या छोट्या गुगल बॉयने वयाच्या 1 वर्ष 2 महिन्यांत 26 देशांचे राष्ट्रध्वज ओळखून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील सर्वात लहान मुलगा आहे.
यशस्वीच्या नावाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद आहे. सर्वात कमी वयात त्याने ही कामगिरी केली आहे. यशस्वीच्या नावावर आतापर्यंत तीन विक्रम नोंद आहेत. इतक्या कमी वयात त्याने हे यश मिळवलंय. यशस्वीचे कुटुंबीय त्याच्या यशाने खूप खूश आहेत. “आमचा मुलगा एवढ्या लहान वयात जे काम करतोय ते पाहून आम्ही खूप जास्त आनंदी आहोत. आम्हाला त्याच्या कामाचा आनंद आहे. यशस्वीच्या नावाने आम्हाला ओळखलं जातं यापेक्षा आनंदाची बाब काय असणार? आम्हाला त्याचा अभिमान आहे”, असं त्याचे आई-वडील सांगतात.