होम वर्क नाही करायचा म्हणून अशी अनोखी शक्कल
हा मुलगा खूप निरागसपणे उत्तरं देतो. ही क्लिप पाहिल्यानंतर लोक प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. कुणी गमतीशीर कमेंट करत आहे, तर कुणी हसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. ही क्लिप एका ट्विटर युजरने शेअर केली होती, जी लोकांना खूप आवडतीये. काही युजर्स तर हा व्हिडीओ एकदा नाही तर अनेकदा पाहिलाय. जर तुम्ही ही क्लिप अद्याप पाहिली नसेल तर पटकन पहा. जेव्हा मूल त्याच्या शाळेतल्या बाईंना आपल्या मनातील गोष्ट सांगतो, तेव्हा बाई खूप खुश होतात आणि त्याला प्रश्न विचारू लागतात. हा मुलगा खूप निरागसपणे उत्तरं देतो. ही क्लिप पाहिल्यानंतर लोक प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. कुणी गमतीशीर कमेंट करत आहे, तर कुणी हसत आहे.
हा व्हिडिओ वर्गात चित्रित करण्यात आलाय. मुलगा शाळेच्या गणवेशात आहे. तो एका शिक्षिकेशी बोलत आहे. मुलाची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करणारी ही महिला दुसरी कोणी नसून त्याची शिक्षिका असल्याचे समजते.
तो बाईंना सांगतो की तुम्ही साडी नेसून आल्यावर खूप छान दिसत होता. मग शिक्षिका म्हणतात का चांगली दिसते? मुलगा उत्तर देतो कारण ही साडी खूप चांगली आहे. इतकंच नाही तर तो मुलगा म्हणतो की तुम्ही माझ्या आवडत्या शिक्षिका आहात.
ही छोटी क्लिप @Sunilpanwar2507 ट्विटर युजरने पोस्ट करत लिहिले- “होमवर्क टाळण्याचे मार्ग”. या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स आपली प्रतिक्रियाही देत आहेत.युजर्सनी ही क्लिप खूपच क्यूट असल्याचं म्हटलं आहे.