वय 93 पण एनर्जी एकदम वाढीव! तुम्हाला आम्हाला जमणार नाही ते आजीने करून दाखवलं…
कदाचित म्हातारपणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनही बदलेल. असे म्हणतात की माणूस हृदयाने म्हातारा किंवा तरुण असतो. कारण, वय हा फक्त एक आकडा आहे. निदान या आजींना नाचताना बघून तरी काहीतरी असंच वाटतं. व्हायरल क्लिपमध्ये वृद्ध महिला 'बिंदिया चमकेगी' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
मुंबई: सोशल मीडियावर व्हायरल झालेला ‘दादी अम्मा’चा हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येईल . दिवसभराचा थकवा नाहीसा होईल. कदाचित म्हातारपणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनही बदलेल. असे म्हणतात की माणूस हृदयाने म्हातारा किंवा तरुण असतो. कारण, वय हा फक्त एक आकडा आहे. निदान या आजींना नाचताना बघून तरी काहीतरी असंच वाटतं. व्हायरल क्लिपमध्ये वृद्ध महिला ‘बिंदिया चमकेगी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
हा अतिशय क्यूट व्हिडिओ गीता नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर @geetaranga17 हँडलवरून शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ एका वृद्धाश्रमातील आहे. यामध्ये साध्या पिवळ्या रंगाच्या साडीत एक 93 वर्षीय महिला ‘बिंदिया चमकेगी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. स्त्रीचे प्रत्येक पाऊल आयुष्यभराच्या अनुभवाने भरलेले असते. वयाच्या या टप्प्यावरही स्त्रीचा उत्साह पाहण्याजोगा असतो.
या व्हिडिओने एक गोष्ट सिद्ध केली आहे की, एखाद्याची आवड जोपासण्यात वयाचा अडथळा नसतो. वृद्ध महिलेच्या मनमोहक डान्स मूव्ह्सने लोकांचे लक्ष तर वेधून घेतलेच आहे, पण कमेंट सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हार्ट आणि लव्ह इमोजी भरले आहेत.
View this post on Instagram
एका युजरने कमेंट केली की, ‘वयाच्या 90 व्या वर्षी मलाही असाच आनंद घ्यायचा आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, अम्मांनी मजा केली. आणखी एका युजरने कमेंट केली की, “वाह तू आजी सुपरच्या वर डान्स केलास.