Dalai Lama यांना राग कधी येतो? छोट्याशा मुलीच्या प्रश्नावर दिलं असं उत्तर…
नुकताच त्यांचा एक अतिशय क्यूट व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते एका मुलीच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत.
दलाई लामा हे भारतात खूप लोकप्रिय आहेत. लोक त्यांचा खूप आदर करतात. ते अनेक दशकांपासून हिमाचल प्रदेश मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची अनेक वक्तव्ये व्हायरल सुद्धा लगेच होतात. नुकताच त्यांचा एक अतिशय क्यूट व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते एका मुलीच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. या व्हिडिओमध्ये मुलीच्या हातात माइक आहे. खरं तर हा व्हिडिओ एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठून आला आहे हे सांगितले गेले नसले तरी तो खूप छान व्हिडिओ आहे.
यात एक मुलगी दलाई लामांना काहीतरी विचारत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी हातात माइक घेऊन दलाई लामांना विचारताना दिसत आहे की, दलाई लामा यांना राग येण्याची वेळ कोणती आहे.
त्यानंतर दलाई लामा थोडे हसून प्रतिसाद देतात. ते म्हणतात की, जेव्हा ते झोपलेले असतात आणि त्यांच्या कानाजवळ डास येतो तेव्हा त्यांना खूप राग येतो. हे सांगताना दलाई लामा गमतीशीर पद्धतीने डासांचा आवाजही काढतात. ते म्हणतात की अशा वेळी त्यांना राग येतो. हे मजेशीर उत्तर ऐकून उपस्थित लोक हसू लागतात.
“Do you get #Angry?”, a little girl asks His Holiness the #DalaiLama. #VideoOfTheDay pic.twitter.com/WKkjO7hIjN
— Yeshi Dawa (@yd_tweets) January 10, 2023
या उत्तरानंतर त्यांना प्रश्न विचारणारी मुलगी सुद्धा हसू लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक स्वत:ची प्रतिक्रिया देत आहेत. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा हे जगभरात खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांना भारतात खूप पसंत केले जाते.