Video | कोरोनाकाळात सकारात्मक उर्जा, ‘हा’ व्हिडीओ पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम ठोकाल

सध्या आसाममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांना एक सकारात्मक उर्जा मिळत आहे. (assam covid centre health professionals dance video)

Video | कोरोनाकाळात सकारात्मक उर्जा, 'हा' व्हिडीओ पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम ठोकाल
ASSAM HOSPITAL VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 4:26 PM

दिसपूर : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी अजूनही हे संकट पूर्णपणे टळलेले नाही. देशात रोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा बरेच आहे. अशा वेळी देशात असे काही प्रसंग समोर येत आहेत, जे आपल्याला निश्चितच दिलासा देतायत. सध्या आसाममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांना एक सकारात्मक उर्जा मिळत आहे. (dance video of health professionals from Covid centre of Assam)

आरोग्य कर्मचाऱ्यांचे रुग्णांसोबत नृत्य

सध्या आसाम राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आसाममधील तिनसुकिया (Tinsukia) जिल्ह्यातील डिगबोई या परिसरातील आहे. या व्हिडीओमध्ये लोक गाण्यावर उत्स्फूर्तपणे नृत्य करताना दिसत आहेत.

पीपीई कीटमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा डान्स

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे यातील काही लोक हे पीपीई कीट घातलेले दिसत आहेत. पीपीई कीट घालून ते गाण्याच्या तालावर ठेका धरत आहेत. पीपीई कीट घातलेले आरोग्य कर्मचारी असावेत. बाजूला असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना हे आरोग्य कर्मचारी नृत्य करायला प्रोत्साहित करतायत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आवाहनानंतर कोरोनाग्रस्त रुग्णसुद्धा मनमोकळेपणाने नृत्य करताना दिसत आहेत.

रुग्णांना तणावमुक्त ठेवण्यासाठी नृत्य आणि व्यायाम

कोरोनाची लागण झाली की अनेक रुग्ण हे मानसिक तणावात असतात. तणावाखाली असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण ताजे आणि तणावमुक्त राहावेत म्हणून त्यांना नृत्य करायला लावण्याचा मार्ग आरोग्य कर्मचाऱ्यांनी निवडला आहे. या व्हिडीओमध्ये आरोग्य कर्मचारी हे कोरोनाबाधितांकडून नृत्यासोबतच हलका-फुलका व्यायामसुद्धा करुन घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांनी ठोकला सलाम

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर अनेकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीला सलाम ठोकला आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटला शेअर करुन त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. कित्येकांनी आरोग्य कर्मचारी आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत, असे अभिमानाने म्हटले आहे.

इतर बातम्या :

Video | कुत्र्याला लागला पत्रकाराचा लळा, व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल !

Video | भर मंडपात नवरी रुसली, नवरदेवाची चांगलीच फजिती, पाहा व्हिडीओ

Video | चित्रकाराची किमया ! उभ्या झाडाच्या मधोमध सुंदर मुलगी, नेमकं रहस्य काय ?

(dance video of health professionals from Covid centre of Assam)

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.