एखाद्या लोकप्रिय गाण्याचा ऑडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताच लोकही याच गाण्याला फॉलो करतात आणि रील बनवतात. तुम्हाला आठवत असेलच की टिकटॉकवर अनेक गाणी ट्रेंडमध्ये आल्यानंतर लोक त्याचं अनुकरण करायचे, जसं आता इन्स्टाग्रामवर पाहिलं जातं. अनेक जण तर व्ह्यूज आणि लाइक्ससाठी ट्रेंडिंग गाण्यांवर रील बनवतात. या ट्रेंडमध्ये, आपण बऱ्याचदा पाहतो की बरेच लोक एका रात्रीत फेमस होतात. लहान मुलांचे डान्स व्हिडिओही इन्स्टाग्रामवर खूप हिट होतात आणि त्यालाही भरपूर व्ह्यूज मिळतात.
शाळेचा गणवेश परिधान करून एका क्लासिक बॉलिवूड गाण्यावर डान्स करणाऱ्या दोन मुलींची एक अप्रतिम इंस्टाग्राम रील व्हायरल झाली आहे. व्हिडीओ बघून कदाचित या मुलींची आई घरी नसावी असंच वाटतं.
व्हिडिओमध्ये, लहान मुली गुरु दत्त आणि मधुबाला स्टारर 1955 मध्ये आलेल्या ‘मिस्टर अँड मिसेस’ चित्रपटातील ‘जाने कहां मेरा जिगर गया जी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे क्लासिक हिट गाणे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायले होते.
भंडारी बहिणींचे मजेशीर हावभाव आणि दमदार डान्स स्टेप्स अनेक नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. दोन्ही बहिणींनी अतिशय गमतीशीर पद्धतीने अभिनय केला, जो लोकांना खूप आवडतो. एका मुलीचा दात तुटलेला दिसतोय. हे दात बघूनच जास्त हसू येतंय.
हैदराबादमध्ये राहणारे मुलींचे वडील रमेश भंडारी छेत्री यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. याला ३.३ दशलक्ष व्ह्यूज आणि २२६ हजार लाईक्स मिळालेत.