AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स

एका परदेशी व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलिकडेच परदेशातला बाप-लेकीचा डान्स व्हायरल झाला होता. ज्यामध्ये 'डान्सिंग डॅड' (Dancing Dad) या नावानं प्रसिद्ध असलेला रिकी पाँड (Ricky Pond) व्हिडिओमध्ये 'कच्चा बदाम' गाण्यावर आपल्या मुलासोबत डान्स करताना दिसत आहे.

Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स
Kacha Badamवर डान्सिंग डॅडचा मुलासह परफॉर्मन्स
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 10:50 AM

Bengali Song Kacha Badam Reel : Kacha Badam हे गाणं गेल्या काही दिवसांत ऐकले नसेल अशी सोशल मीडियावर सक्रिय असलेली व्यक्ती क्वचितच कोणी असेल. आजकाल बंगाली गाणं कच्चा बदाम इंटरनेटवर खूप वेगानं ट्रेंड होत आहे. लोकांनी एका विक्रेत्याच्या गाण्यावर ताल लावून नृत्यदिग्दर्शन केलं. आता इन्स्टाग्रामवर प्रत्येकजण या ग्रामीण भागातल्या विक्रेत्याच्या गाण्यावर रील (Reel) बनवत आहे. ज्यांना बंगाली भाषा कळत नाही, तेही हे गाणं मनापासून ऐकत आहेत. अशाच एका परदेशी व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलिकडेच परदेशातला बाप-लेकीचा डान्स व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ‘डान्सिंग डॅड’ (Dancing Dad) या नावानं प्रसिद्ध असलेला रिकी पाँड (Ricky Pond) व्हिडिओमध्ये ‘कच्चा बदाम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तो आपल्या मुलासोबत डान्स करताना दिसत आहे.

नव्या स्टाइलमध्ये डान्स

जबरदस्त डान्स स्टेप्समुळे ‘डान्सिंग डॅड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँन्डनं हा धमाकेदार व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो जबरदस्त परफॉर्मन्स देत असल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये रिकी एका नव्या स्टाइलमध्ये कसा डान्स करत आहे, ते पाहा…

‘तुम्हाला माहीत आहे का या गाण्याचे बोल काय आहेत?’

‘डान्सिंग डॅड’च्या या धमाल डान्स व्हिडिओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर सुमारे 51 हजारहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे. यासोबतच त्यानं हे गाणं एका चाहत्याच्या सांगण्यावरून केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की गाणं आणि त्यावर केलेल्या स्टेप्स खरोखरच अप्रतिम आहेत. तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की तुम्हाला माहीत आहे का या गाण्याचे बोल काय आहेत? आणखी एका यूझरनं लिहिलंय, की बाप-मुलाची जोडी खूपच सुंदर आहे आणि डान्स शानदार आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही दिसत आहेत.

रिकी पाँडची फॅन फॉलोइंग मोठी

रिकी पाँडची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. हा व्हिडिओ त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वेगळ्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. जेव्हा जेव्हा रिकी पाँन्ड एखादा डान्स व्हिडिओ शेअर करतो तेव्हा लोक त्यावर जोरदार कमेंट करतात.

View this post on Instagram

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

Viral : गिफ्ट बॉक्स उघडताच नववधू आधी विचारात पडली अन् मग हसली, काय खास असेल? पाहा Video

तंदूरी ऑम्लेटचा तडका, अंग अंग भडका..! दिल्लीच्या या काकांनी बनवलीय अजबच रेसिपी, Video Viral

Viral Video : चक्क गेंड्याचं चुंबन घेतेय ‘ही’ तरुणी; यूझर्स म्हणतायत, जंगली प्राण्यांपासून दूर राहा, भडकला तर…

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.