Dancing Underwater: भाई असा तसा नाय काय, पाण्याखाली डान्स! विषय खोल…

हा व्हिडीओ मात्र हटके आहे. या व्हिडीओमध्ये या मुलाने पाण्याखाली डान्स केलाय. जिथे माणसाला पाण्याखाली गेल्यावर काहीच कळत नसेल तिथे या माणसाने डान्स केलाय. कमालाय नाही का? व्हिडीओ बघा...

Dancing Underwater: भाई असा तसा नाय काय, पाण्याखाली डान्स! विषय खोल...
Dancing UnderwaterImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 11:50 AM

डान्स म्हणलं की मायकल जॅक्सन (Michael Jackson) ! मायकल जॅक्सनचा खूप मोठा फॅन बेस आहे. बरीच लोकं मायकल जॅक्सनला कॉपी करतात. चाहतावर्ग मोठा असल्याने कोण कुणापेक्षा चांगलं मायकल जॅक्सनला कॉपी करतं अशी एक वेगळीच स्पर्धा चाहत्या वर्गात असते. “मून वॉक” (Moon Walk) हा त्याचा प्रसिद्ध प्रकार जो सगळ्यांनाच करावासा वाटतो. इंटरनेटवर बरेच मून वॉक पाहायला मिळतील ज्यात मायकल जॅक्सनला कॉपी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तेही त्याच्याच गाण्यावर! हा व्हिडीओ मात्र हटके आहे. या व्हिडीओमध्ये या मुलाने पाण्याखाली डान्स (Dancing Underwater)केलाय. साधासुधा डान्स नाही, मून वॉक केलाय. जिथे माणसाला पाण्याखाली गेल्यावर काहीच कळत नसेल तिथे या माणसाने मून वॉक केलाय. कमालाय नाही का? व्हिडीओ बघा…

व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Hydroman (@hydroman_333)

या व्हिडीओमध्ये एक डान्सर मायकल जॅक्सनच्या ‘स्मूथ क्रिमिनल’ गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. पाण्याखालील अतिशय दिमाखदार पद्धतीने मूनवॉक करतोय, जे पाहून लोक स्तब्ध झालेत.

जयदीप गोहिल असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने या आधीही असे बरेच डान्स केलेत. पण हा डान्स लोकांना प्रचंड आवडलाय. ही व्यक्ती इंस्टाग्रामवर ‘हायड्रोमॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध आहे.

इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हायड्रोमॅनचे लाखो फॉलोअर्स आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर पाण्याखाली डान्स करण्याची या व्यक्तीचा किती सराव असेल हे कळून येतं.

8 सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. याला ९ लाखांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्यात.

सोशल मीडिया यूजर्स त्याच्या टॅलेंटचं कौतुक करतायत. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सननेही हा व्हिडीओ पाहायला असता तर खूप कौतुक केलं असतं असंही नेटकरी म्हणतायत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.