लहान मुलगा सापाला घेऊन चाललाय! हा खतरनाक व्हिडीओ बघा
कधीही खराब होऊ शकते. एक आश्चर्यकारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. एक मुलगा हातात साप घेऊन घरात फिरत आहे. त्याला पाहून त्याचे कुटुंबीय खूप घाबरतात. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
मुंबई: लोक बरेचदा भीतीदायक प्राण्यांसोबत स्टंट करतात. असे व्हिडिओ इंटरनेटवर अनेकदा व्हायरल होत असतात. अशा प्राण्यांना टाळले पाहिजे कारण अशा परिस्थितीत अगदी काहीही होऊ शकते. योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. कधीही खराब होऊ शकते. एक आश्चर्यकारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. एक मुलगा हातात साप घेऊन घरात फिरत आहे. त्याला पाहून त्याचे कुटुंबीय खूप घाबरतात. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओची सुरुवात एका मुलाने सापाची शेपटी पकडून आपल्या घरात खेचून आणल्यापासून होते. साप पकडताना मुलगा खूप कम्फर्टेबल वाटतो. जणू त्याचं रोजचं काम आहे असं वाटतं. साप पाहून हैराण झालेल्या आणि घाबरलेल्या आपल्या कुटुंबाकडे तो साप आणतो आणि शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला त्या मुलाला तिथून घेऊन जाण्यास सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा साप घेऊन जाणारा मुलगा अजिबात घाबरत नाहीये.
View this post on Instagram
नंतर एक माणूस खोलीत येतो आणि त्या मुलाचा हात पकडून त्याला कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर खेचतो. मात्र, तो व्यक्ती मुलापासून साप काढून घ्यायचा प्रयत्न करत नाही. त्याऐवजी तो शांतपणे त्यांना इतरांपासून दूर नेताना दिसतो. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला 18 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं असून तो सातत्याने पाहिला जात आहे. त्याला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक सोशल मीडिया युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे.