गोंडस कुत्र्याची दाढी आहे जमिनीपर्यंत लांब, मालकीणबाई दररोज तासभर विंचरतात Teddy Dog चे केस

सध्या सोशल मीडियावर एक गोंडस कुत्रा खूप चर्चेत आहे. टेडी (Tedy) नावाच्या या कुत्र्याची दाढी इतकी सुंदर आहे की प्रत्येक जण त्याचे कौतुक करत राहतात. टेडीची दाढी जमिनीपर्यंत लांब लोंबकळते. ती महिन्याला ट्रिम करावी लागते

गोंडस कुत्र्याची दाढी आहे जमिनीपर्यंत लांब, मालकीणबाई दररोज तासभर विंचरतात Teddy Dog चे केस
Teddy Dog
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 10:29 AM

मुंबई : सोशल मीडियामुळे (Social Media) आजच्या काळात कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. हे असे व्यासपीठ आहे, ज्याच्या मदतीने जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणारी घटना क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत पसरते. यामुळे, आजच्या युगात जग खूप लहान भासू लागले आहे. सुरुवातीला फक्त माणसं सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायची, पण आता तर इन्स्टावर कुत्रे-मांजरी देखील लोकप्रिय (Insta Famous Dogs-Cats) होत आहेत. आम्ही ज्या कुत्र्याबद्दल बोलत आहोत त्याला कदाचित तुमच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील. ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) हार्टलपूलमध्ये (Hartlepool) राहणाऱ्या एका क्यूट कुत्र्याची.

टेडीची दाढी जमिनीपर्यंत लांब

सध्या सोशल मीडियावर एक गोंडस कुत्रा खूप चर्चेत आहे. टेडी (Tedy) नावाच्या या कुत्र्याची दाढी इतकी सुंदर आहे की प्रत्येक जण त्याचे कौतुक करत राहतात. टेडीची दाढी जमिनीपर्यंत लांब लोंबकळते. ती महिन्याला ट्रिम करावी लागते, तर दररोज त्यातून कंगवाही फिरवावा लागतो. टेडी आपल्या स्टायलिश लूक आणि व्यक्तिमत्त्वाने लोकांची मने जिंकत आहे. टेडीच्या दाढीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्याची मालकीण निकोला विलकॉक्स हिला त्याचे लूक मेंटेन ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात.

दाढी आणि शेपटीचे केस ट्रिम

टीम डॉग्जच्या अहवालानुसार, निकोलाला टेडचा सुपरकूल लूक टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. 50 वर्षीय निकोला महिन्यातून एकदा टेडीची दाढी आणि शेपटीचे केस ट्रिम करते. यासह, त्याचे केस दररोज एक तास विंचरावे लागतात. निकोलाने सांगितले की लोक टेडला पाहताच त्याचं कोडकौतुक करायला लागतात. तो जिथून जातो तिथे लोक थांबतात आणि त्याला हाक मारु लागतात.

निकोलाच्या मते, टेडला सांभाळणे खूप कठीण आहे. त्याची दाढी इतकी मोठी होते की ती जमिनीपर्यंत घासू लागते. त्याची दाढी पाहून लोकांना आश्चर्य वाटते. निकोलाला पाच वर्षांचा ग्रूमिंगचा अनुभव आहे. टेडी 9 वर्षांचा आहे. त्याची दाढी खूप लांब वाढते. अशा परिस्थितीत त्याचे ट्रिमिंग महिन्यातून एकदा आवश्यक होते. मात्र, या दाढीमुळे तो चर्चेत आहे. टेडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या :

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Video | तहानलेल्या कुत्र्याची पाण्यासाठी वणवण, नळाजवळ येताच माणसाने ओंजळ समोर केली, व्हिडीओ व्हायरल

“अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय” अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.