पैसे नव्हते तरीही एका छोट्या मुलीने वडिलांचा वाढदिवस असा साजरा केला! कौतुकास्पद
आनंद कधीही संपत्तीचा गुलाम नसतो. पप्पांचा वाढदिवस होता, फुग्यांसाठी पैसे नव्हते...
कवी सुमित ओरछा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. मोठ्या संख्येने लोक त्यांच्या फेसबुकच्या पोस्टचे कौतुक करतात. त्यांची एक पोस्टला खूप लाईक केलं जात आहे. ही पोस्ट एका मुलीबद्दल आहे जिने आपल्या वडिलांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे.
सुमीत ओरछा लिहितात, ‘आनंद कधीही संपत्तीचा गुलाम नसतो. पप्पांचा वाढदिवस होता, फुग्यांसाठी पैसे नव्हते म्हणून मुलीने पॉलिथीन फुगवून त्याचे फुगे केले आणि पप्पांचा वाढदिवस साजरा केला. म्हणूनच असं म्हणतात की, मुली नशिबाने मिळतात .”
या पोस्टला आतापर्यंत 2400 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. बऱ्याच लोकांनी कमेंट केली आणि मुलीचे कौतुक केले, तिच्या वडिलांचंही वाढदिवसानिमित्त अभिनंदन केले.
या पोस्टवर कमेंट करताना मुकेश नायक यांनी लिहिले की, ‘अगदी बरोबर म्हटले आहे की, हॅपी बर्थडे आणि मुलीच्या वडिलांचे अभिनंदन. मुली म्हणजे अरमान, मुली म्हणजे जीवन असतात.”
मनीष पांडे लिहितो, ‘मुली नशिबाने भेटतात, हे अटल सत्य’.