Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जग बदलणारे ग्रंथ’ आता स्टोरीटेल मराठीवर, मराठी रसिकांसाठी पर्वणी!

तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि जगात बदल घडवून आणण्याची उर्मी तुमच्यात असेल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे.

'जग बदलणारे ग्रंथ' आता स्टोरीटेल मराठीवर, मराठी रसिकांसाठी पर्वणी!
दीपा देशमुख
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 8:34 PM

मुंबई: तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील आणि जगात बदल घडवून आणण्याची उर्मी तुमच्यात असेल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. कारण ‘जग बदलणारे ग्रंथ’ (jag badalnare granth) आता तुम्ही फक्त ऐकू शकणार आहात. ‘स्टोरीटेल मराठी’ (storytel marathi) या अॅपवर. दीपा देशमुख (deepa deshmukh) यांची पुस्तकं आता स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार आहेत. त्याविषयी जाणून घेऊयात…

‘स्टोरीटेल मराठी’ सदैव अनमोल दुर्मिळ साहित्य संपदा आपल्या ऑडिओबुक्स’च्या माध्यमातून प्रकाशित करीत असते. प्रख्यात लेखिका दीपा देशमुख यांचा ‘जग बदलणारे ग्रंथ’ हा अत्यंत वेगळा ग्रंथ ‘स्टोरीटेल मराठी’वर प्रकाशित होत आहे. या ग्रंथांमधील दर आठवड्याला एक लेख याप्रमाणे ते वर्षभर रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. लेखिका दीपा देशमुख यांनी सुचविलेले मूळ ५० निवडक ग्रंथ प्रत्येकाने अखंड ऐकावेत असे असले तरी ज्यांना तितका वेळ नाही ते पंधरा ते वीस मिनिटे ऐकून मूळ ग्रंथाची ओळख थोडक्यात करून घेऊ शकतात. जानेवारी महिन्यात यातील ६ ग्रंथावरील लेखमाला रसिकांना ऐकायला मिळणार असून लेखिका दीपा देशमुख, अमोघ चंदन, सचिन सुरेश, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात पहिल्या ६ ग्रंथांचा रंजक परिचय ऐकता येणार आहे.

‘जग बदलणारे ग्रंथ’

‘ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग, लोभ, मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ग्रंथ आपले जिवलग मित्र आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी या ग्रंथांशी दोस्ती करायलाच हवी. जरूर ऐका ‘जग बदलणारे’ ग्रंथ!’, दीपा देशमुख म्हणाल्या आहेत.

‘माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. माणसाच्या वाटचालीत स्त्रीवर लादलेलं दुय्यमत्व झुगारण्यासाठी तिनं संघर्ष केला आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी ठाम भूमिका घेतली. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली, कधी त्यानं विज्ञानाची साथ घेतली, तर कधी तंत्रज्ञानाची मदत घेतली. कधी त्यानं स्वत:ला समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची शाखा निर्माण केली. कधी त्यानं व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अर्थशास्त्राची सोबत घेतली. कधी त्यानं आपली मूल्यं विकसित करताना त्यांना तत्त्वज्ञानाची जोड दिली. या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज ‘ग्रंथ’ रुपात जतन करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू ठेवली.’, असं दीपा देशमुख म्हणाल्यात.

‘आज जगभरात धर्म, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक ५० ग्रंथ घेऊन त्यांची ओळख व त्यावर केलेलं भाष्य ‘जग बदलणारे ग्रंथ’ मध्ये करण्यात आले आहे. कुतूहल, ज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे ग्रंथ’ची स्टोरीटेलवर दर आठवड्याला वर्षभर प्रकाशित होणारी संपूर्ण मालिका ऐकायलाच हवी, असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे जग बदलणारे हे ग्रंथ नक्की ऐका.

संबंधित बातम्या

Vastu | सावधान! घरात हे बदल आजच करा नाहीतर आनंदाला ग्रहण लागच म्हणून समजा

Diya Rmedies | शुभं करोति कल्याणम् ! दिवांच्या तेज्योमय प्रकाशात तुमचे आयुष्य करा प्रकाशित, जाणून घ्या दिव्यांबद्दल रंजक माहिती

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 3 गोष्टींबाबत नेहमी असमाधानी राहा, यश तुमचेच असेल

उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर.
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्.
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.