Video : हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्याने शक्कल लढवली, पण एका चुकीमुळे त्याचे कष्ट वाया गेले, पाहा व्हीडिओ…

हरणाचा आणि बिबट्याचा हा व्हीडिओ Saket_Badola या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

Video : हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्याने शक्कल लढवली, पण एका चुकीमुळे त्याचे कष्ट वाया गेले, पाहा व्हीडिओ...
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 6:14 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात प्राण्यांचे व्हीडिओ वाऱ्याच्या वेगाने पसरतात. अआताही अश्याच एका व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. एक व्हीडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हीडीओमध्ये बिबट्या आपली शिकार पकडण्यासाठी शक्कल लढवतो. पण त्याच्या या कष्टाचा काहीही फायदा होत नाही.

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ एखाद्या जंगलातील असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतं. कच्चा रस्ता आणि झाडं या व्हीडीओत दिसत आहेत. या रस्त्यावर बिबट्या बसलेला दिसतोय. बिबट्या कुठलीही हलचाल न करता दगडासारखा बसून आहे. बिबट्या आपल्या भक्ष्याची वाट पाहत असतानाच त्याच्या समोर एक हरिण येतं. गुपचूप पडून असलेला हा बिबट्या आपली शिकार जवळ येण्याची वाट पाहत असतो. त्याला हे हरिण दिसतं पण बिबट्याचा हा डाव हरणाच्या लक्षात येतो आणि हे हरिण तिथून पळून जातं. बिचाऱ्या बिबट्याला हुशारी दाखवूनही शिकार करता येत नाही. तो केवळ बघतच राहातो.

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ पाहायला मिळतात. हा हरणाचा आणि बिबट्याचा हा व्हीडिओ Saket_Badola या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तसंच 13 हजारांहून अधिक लोकांनी व्हीडीओला लाइक देखील केलं आहे. हा व्हीडीओ गेल्या वर्षीही खूप चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

कुत्रा, वाघ आणि सिंह यांच्या एका व्हीडिओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. यात कुत्रा वाघाची शिकार करताना दिसतोय. विशेष म्हणजे यात हा वाघ अतिशय शांत आहे तो कुत्र्यावर प्रतिहल्ला करत नाहीये. त्याचा असा शांत अवतार पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. यात आणखी एक अशीच आश्चर्य वाटावी अशी गोष्ट दिसतेय, ती म्हणजे शेजारी उभा असलेला सिंह मात्र ही भांडणं शांतपणे पाहातोय. तो यात ना सहभागी होतोय. ना कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Meemlogy (@meemlogy)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.