Merry Christmas: हा व्हिडीओ पाहिलात का ज्यात हरणांचा कळप विमानासह आकाशात उडतो?
एका युझरने लिहिले, 'हे खरे आहे की बनावट?'
नाताळ हा भारतासह जगभरात साजरा केला जाणारा सण आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक ख्रिसमस ट्री सजवतातच, शिवाय घराला रंगीबेरंगी झुंबरांनी सजवतात याने घराची चमकही वाढते. ख्रिसमसबाबत सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यातील काही खूप मजेशीरही असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ एमिरेट्स एअरलाइन्सने शेअर केला आहे, ज्यामुळे लोकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे, तर काही लोक हैराण झाले आहेत.
खरंतर या व्हिडीओमध्ये हरणांचा कळप विमानासह आकाशात उडतो. हे दृश्य असे आहे की ते पाहून कोणालाही धक्का बसेल. या व्हिडिओचं सत्य काय आहे यावर काही लोकांचा विश्वासच बसत नाहीये, त्यामुळे ते ‘हे खरं आहे का?’, असा प्रश्न विचारत आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाच्या माथ्यावर एक मोठी सांताक्लॉज कॅप ठेवली आहे आणि काही हरिण धावपट्टीवर जहाजाला खेचत ते उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही सेकंदातच हरणांचा कळप त्या विमानासह आकाशात उडून जातो. हे दृश्य असे आहे की, त्या विमानाबरोबर मृग खरोखरच आकाशात उडून गेले आहेत असे वाटते. हा व्हिडिओ खरंच खूप छान आहे.
View this post on Instagram
त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिले, ‘हे खरे आहे की बनावट?’, तर दुसऱ्या युझरने गंमतीने ‘मीही त्या फ्लाइटमध्ये होतो’, असे लिहिले.