दोरीच्या उडीसोबत पराक्रम! कमाल आहे ही मुलगी, दिल्लीचा व्हिडीओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
कलाकार कट्ट्यासारखा इथे माहोल असतो. लोकं येतात छान कलाकारी दाखवतात, व्हिडिओही काढतात.
दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये रोज हजारो लोक पाहायला मिळतात. लोक खरेदीपासून ते खाण्या-पिण्यापर्यंत सगळीच मजा इथे करतात. कॅनॉट प्लेस ही जागा तरुण तरुणींसाठी भन्नाट जागा आहे. कलाकार कट्ट्यासारखा इथे माहोल असतो. लोकं येतात छान कलाकारी दाखवतात, व्हिडिओही काढतात. अनेकदा दिल्लीतून जे व्हिडीओ व्हायरल होतात ते इथूनच होतात कॅनॉट प्लेस वरून. अनेक शहरांनी आता अशा जागा तयार होतायत जिथे कलाकार जाऊन आपली कलाकारी दाखवू शकतात. दिल्लीचं “कॅनॉट प्लेस” ही अशीच एक जागा! सध्या इथला एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
कॅनॉट प्लेस वर शेकडो लोक फिरत असतात. काही प्रतिभावान लोक इथे येऊन त्यांच्यातली आपली कामगिरी दाखवतात.
काही लोक थांबून त्यांना पाहणे पसंत करतात, तर काही जण असे असतात की जे लक्षच देत नाहीत. एक मुलगीही कॅनॉट प्लेसला पोहोचली आणि मग तिने दोरीच्या उड्या घेऊन हे असे कारनामे केले.
होय, सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात दोरीने उड्या मारणारे स्टंटबाज व्हायरल होतात.
ही मुलगी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर वाटत होती. तिने जम्पिंग जॅकची दोरी आपल्या हातात घेतली आणि मग डझनभर लोक बसलेल्या ठिकाणी पोहोचली.
मुलीने आपल्या दोरीने काही सेकंदात असे पराक्रम केले, ज्याचा कोणालाही अंदाज आला नसेल. दोरीने उडी मारत असताना अचानक ही मुलगी जमिनीवर बसली. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले लोकांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या.
View this post on Instagram
हा ट्रेंडिंग व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. मुलीचा स्टंट व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ priyu_skipper01 नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.