हे काय चाललय? कधी गाल पकडते, कधी केस, आंटी भडकल्या, Metro मधला Video
या व्हिडिओला आतापर्यंत इतके लाख व्ह्यूज. तुम्ही कोणीच का बोलला नाहीत?. आंटीचे हे शब्द ऐकून मुलगी जाम भडकली. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं त्या मुलीने विचारलं. मेट्रोमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोची सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चा होते. कधी सीटवरुन महिलांमध्ये भांडण, शिवीगाळ झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. आता एका आंटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका कपलवर ही आंटी जाम भडकली आहे. खच्चून भरलेल्या मेट्रोलमध्ये एक कपल खुल्लमखुल्ला रोमान्स करत होतं. त्यावेळी एक आंटी समोर बसल्या होत्या. हे सर्व पाहून त्या आंटी भडकल्या. त्यांनी सर्वांसमोर मुलीचा क्लास घेतला. आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रो खच्चून भरलेली आहे. दरवाजावर उभी असलेली आंटी आणि एका कपलमध्ये जोरदार भांडण सुरु आहे. रोमान्स करायचा असेल, तर बाहेर जाऊन करा, असं आंटी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसते.
हे काय चाललय?. कधी मुलगी मुलाच्या गालाला स्पर्श करते. कधी त्याच्या केसामधून हात फिरवते. हे बोलताना आंटी तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर सुद्धा भडकली. तुम्ही कोणीच का बोलला नाहीत?. आंटीचे हे शब्द ऐकून मुलगी जाम भडकली. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं त्या मुलीने विचारलं. त्यावर महिला प्रेमाने त्या मुलीला समजावते. हे सर्व चांगल दिसत नाही. बाहेर जाऊन तुम्ही काय तो रोमान्स करा. यावेळी सहप्रवाशी या महिलेच्या हो मध्ये हो मिसळतात आणि मुलीला समजावतात.
Kalesh b/w a Aunty and a Couple inside Delhi metro over couple were hugging each other inside metro pic.twitter.com/QUkGMtoq4T
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 6, 2023
किती लाख व्ह्यूज
21 सेकंदाची ही क्लिप मायक्रो ब्लॉगिंग साइट X ) @gharkekalesh हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. बातमी लिहित असताना आतापर्यंत 1 लाख 32 हजार व्ह्यूज आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना लोक त्यावर कमेंट सुद्धा करत आहेत. दिल्ली मेट्रोच वेगळच सुरु आहे, असं एका युजरने लिहिलं आहे. दिल्ली मेट्रो वादाचा अड्डा बनला आहे, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. अन्य एका युजरने जेठालालच मीम शेयर करत लोकांची पंचाईत करण्याची सवय गेलेली नाही, असं लिहिलं आहे.