मेट्रोमध्ये बिकिनी घालणाऱ्या ‘त्या’ तरुणीची अखेर प्रतिक्रिया समोर; पब्लिसिटी स्टंट नव्हे तर…

दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात एक मुलगी बिकिनी घालून प्रवास करताना दिसून आली. एका महिलेनेच या बिकिनी वाल्या मुलीचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हटलं, "हेच का महिला सक्षमीकरण?". यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. कुणी विरोध केला, कुणी समर्थन. या बिकिनी वाल्या मुलीचे व्हिडीओ, फोटो प्रचंड व्हायरल झाले.

मेट्रोमध्ये बिकिनी घालणाऱ्या 'त्या' तरुणीची अखेर प्रतिक्रिया समोर; पब्लिसिटी स्टंट नव्हे तर...
Bikin girl delhi metroImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 1:37 PM

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुणी भुताचे कपडे घालून या मेट्रो मध्ये शिरतं, तर कुणी डान्स करत बसतं. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचा या सगळ्या गोष्टींना विरोधही तितकाच आहे आणि न बोलता समर्थन सुद्धा तितकंच आहे. व्हिडीओ मात्र काहीही असलं तरी लगेच व्हायरल होतात. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात एक मुलगी बिकिनी घालून प्रवास करताना दिसून आली. एका महिलेनेच या बिकिनी वाल्या मुलीचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हटलं, “हेच का महिला सक्षमीकरण?”. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. कुणी विरोध केला, कुणी समर्थन. या बिकिनी वाल्या मुलीचे व्हिडीओ, फोटो प्रचंड व्हायरल झाले. आता या मुलीची प्रतिक्रियाच समोर आली आहे. काय वाटतं काय म्हणाली असेल ही मुलगी?

ही तरुणी जेव्हा माध्यमांशी बोलली तेव्हा तिची प्रतिक्रिया, “मला लोक काय म्हणतात याने काहीच फरक पडत नाही” अशीच होती. होय! माझ्या घरचेही जुन्याच विचारांचे असून त्यांनाही माझं असं वागणं फारसं आवडत नसल्याचं तिनं म्हटलं. तिला अशी फॅशन, असे कपडे घालायला आवडतात आणि ती व्हायरल व्हावं म्हणून हे सगळं करत नाही असंही म्हणाली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, मला काय घालायला आवडतं किंवा मला काय घालायचं आहे हे फक्त माझ्यावर अवलंबून आहे. मी कोणताही पब्लिसिटी स्टंट करत नाही किंवा प्रसिद्ध होण्यासाठी हे करत नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे मला महत्त्वाचे नाही.

अनेकांनी मुलीचे फोटो पाहिले आणि सांगितले की ती कदाचित उर्फी जावेदची नक्कल करत होती. मात्र यावर मुलीने मला उर्फीबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिदम चनाना असं या मुलीचं नाव असून ती 19 वर्षांची आहे. माझे कुटुंबीयही यामुळे खूश नाहीत आणि यामुळे शेजारीही मला धमकावत आहेत. मला जे हवं ते मी घालते. लोक काय बोलतात याने काही फरक पडत नाही.

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीनेही आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना सभ्य कपडे घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलीने सांगितले की, मेट्रोमध्ये ट्रेनमध्ये व्हिडिओग्राफीसाठी कायदा आणि सुव्यवस्था नाही. जर त्यांना माझ्या कपड्यांबाबत काही प्रॉब्लेम असेल तर मेट्रोच्या आत व्हिडिओ बनवणाऱ्यां सोबतही सामान नियम असायला हवेत.

मीदेखील पुराणमतवादी कुटुंबातील आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही यावर आक्षेप आहे, परंतु मला वाटते की हे माझे जीवन आहे, मला जे हवे ते मी करीन. मी अनेक महिन्यांपासून मेट्रोत प्रवास करत आहे. पिंक लाइनवर मला अनेकदा अडवलं गेलं आहे, पण बाकीच्या लाईनवर मी प्रवास करते. मला सुरक्षेबाबत कोणतीही अडचण नाही. मला आता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायची सवय झाली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.