दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल!

सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात तिने वेगवेगळ्या रंगांची बिकिनी घातली आहे. हे फोटो आणि व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील असल्याचे सांगण्यात येत आहेत.

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल!
Metro delhiImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:20 AM

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो मधील अनेक अनेक व्हिडीओ याआधी सुद्धा व्हायरल झालेले आहेत. त्यावर बरेच लोक आक्षेप घेतात तर बरेच त्याचं समर्थन करतात. मेट्रोत दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दिल्ली सारख्या ठिकाणी मेट्रोचे जाळे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात तिने वेगवेगळ्या रंगांची बिकिनी घातली आहे. हे फोटो आणि व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील असल्याचे सांगण्यात येत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. ही पोस्ट ज्या व्यक्तीने शेअर केली आहे त्या व्यक्तीने, “हेच का महिला सक्षमीकरण?” असं विचारलंय. त्यामुळे या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस सुरु आहे. आपल्यालाही हा व्हिडीओ बघून प्रश्न पडतो. नेमकं या मुलीला सांगायचंय काय?

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

बिकिनी घातलेल्या या मुलीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका नव्या फोटोमध्ये ही मुलगी एका वेगळ्या रंगाची बिकिनी परिधान करताना दिसत आहे. असंही म्हटलं जातंय की तिने यापूर्वी अनेकदा मेट्रोने प्रवास केला आहे. मुलीने शरीर झाकण्यासाठी मोजकेच कपडे घातले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी सीटवर बसून बॅगेमागे लपून बसलेली दिसत आहे. यानंतर ती सीटवरून उठून निघून गेली. एका फोटोत ती इतर प्रवाशांसोबत प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे, याची माहिती मिळालेली नाही. या मुलीबाबतही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या मुलीसारखे पुरुषही कमी कपडे घालून प्रवास करू शकतात का, असा प्रश्न सोशल मीडियावर लोक विचारत आहेत.

एका युजरने म्हटले की, जर हे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण असेल तर दुर्दैवाने आपली तरुण पिढीच्या मुली अशा चुकीच्या सक्षमीकरणाला बळी पडतायत आणि हेच निर्लज्ज स्त्रीवाद्यांना हवे आहे. याला मी सांस्कृतिक नरसंहार म्हणेन. आणखी एका युजरने लिहिले की, ‘स्वातंत्र्य, आधुनिकतेच्या नावाखाली हे सर्व? मला काय बोलावे ते समजत नाही. तिसऱ्या युजरने लिहिलं की, “मी काही बोललो तर असं म्हटलं जाईल की माझी विचारसरणी लहान आहे. तरीही हे स्वातंत्र्य नसून मानसिक वेडेपणा आहे.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.