व्हायरल व्हिडिओ बघून लोकांची प्रतिक्रिया, “हेच जर उलट घडलं असतं तर?”

| Updated on: Jul 04, 2023 | 1:03 PM

गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोमध्ये अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डान्स असो, महिलांमधील भांडण असो, कपल्समधील रोमान्स असो किंवा शॉर्ट ड्रेस घालून मेट्रोचा प्रवास असो, मेट्रोचे सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल व्हिडिओ बघून लोकांची प्रतिक्रिया, हेच जर उलट घडलं असतं तर?
girl slap a boy in a metro
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोमध्ये अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डान्स असो, महिलांमधील भांडण असो, कपल्समधील रोमान्स असो किंवा शॉर्ट ड्रेस घालून मेट्रोचा प्रवास असो, मेट्रोचे सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, दिल्ली मेट्रोच्या आत एक मुलगी अचानक एका मुलासमोर जाते आणि त्याला कानाखाली मारू लागते. मुलगा मुलीचे बोलणे ऐकत शांतपणे उभा राहतो आणि मेट्रोच्या आत बसलेली लोकं तिच्याकडे पाहत राहतात.

दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचानक एक मुलगी मेट्रोत येते आणि गेटजवळ उभ्या असलेल्या एका मुलाला कानाखाली मारते. यानंतर ती जोरजोरात रडू लागते. आवाज स्पष्ट नसला तरी दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचे समजते. मात्र, भांडणात कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडिओतील मुलानेही प्रतिक्रिया दिली नाही. कानाखाली मारल्यानंतरही तो मुलीचे ऐकत होता. मेट्रो एका स्टेशनवर थांबते आणि प्रवासी येतात आणि निघून जातात, पण भांडण थांबत नाही.

व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया

एका अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा आणि मुलगी यांच्यात भांडण – मुलगी त्याला खूप जोरात कानाखाली मारते, जरा कल्पना करा की हे उलट झाले असते तर?”. कुणी म्हणलं की त्या मुलाची चूक असेल, तर कुणी म्हटलं की कदाचित त्या मुलाची चूक नसावी, तो फक्त मुलीचे बोलणे शांतपणे ऐकत असेल. हे प्रकरण नेमकं काय आहे हे मात्र कळू शकले नाही.