Delhi Traffic Police | कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांचा ‘हा’ मोलाचा सल्ला..

Delhi Traffic Police | दिल्ली ट्रॅफिक पोलीस नेहमीच ट्विटरवर सक्रिय असतात. ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट करून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काय आहेत त्या ती गोष्टी, जाणून घ्या.

Delhi Traffic Police | कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांचा ‘हा’ मोलाचा सल्ला..
वाहतूक पोलिसांचा मोलाचा सल्लाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 12:00 PM

Delhi Traffic Police | दिल्ली ट्रॅफिक पोलीस (Delhi Traffic Police) लोकांमध्ये रहदारीच्या नियमांबद्दल जागरूकता आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत असतो. दिल्ली ट्रॅफिक पोलीस नेहमीच ट्विटरवर (Twitter) सक्रिय असतात. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नुकतेच एक ट्विट करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 5 गोष्टींचा उल्लेख आहे.

3 महत्वाच्या गोष्टी कोणत्या..

परंतु ट्रॅफिक पोलिसांचे म्हणणे आहे, की शेवटच्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या (3 useful things) आहेत. त्यामुळे त्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांचे अवलंबन न केल्यास काय होईल याचीही माहिती शेअर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अलीकडेच एक ट्विट करण्यात आले आहे. ‘या वर्षी 5 गोष्टी तुम्ही चुकवू नये. विशेषतः शेवटच्या 3’, या कॅप्शनसह 19 सेकंदांचा व्हिडिओ पोलिसांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे T20 क्रिकेट वर्ल्ड कप, दुसरी गोष्ट म्हणजे FIFA वर्ल्ड कप. यानंतर अशा 3 गोष्टी ज्यावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल, असे म्हटले आहे.

3 सर्वात महत्वाच्या गोष्टी

तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेट, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहनाचा विमा आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किंवा तुमच्यासोबत इतर कोणीही गाडीत प्रवास करत असेल तर त्यांनी नेहमी सीट बेल्ट लावण्याची विशेष काळजी घ्यावी. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांचे म्हणणे आहे की, पुढच्या आणि मागच्या बाजूला बसलेल्या लोकांनीही सीट बेल्ट लावणे अत्यंत आवश्यक आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.