Traffic Police: “ट्राफिकमध्ये कंटाळा आला तर असं काहीतरी करा” ट्राफिक पोलिसांचा सल्ला
ही क्लिप पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलने शेअर केली आहे. पावसाळा आणि वाहतुकीची कोंडी पाहून आपली प्रचंड चिडचिड होते.
दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरच्या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ही क्लिप दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलने शेअर केली आहे. पावसाळा आणि वाहतुकीची कोंडी पाहून आपली प्रचंड चिडचिड होते. हा व्हिडीओ उत्साह वाढविणारा आहे. दिल्ली पोलिसांना याचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओ सोबत त्यांनी एक महत्त्वाचा मेसेज सुद्धा शेअर केलाय.
या व्हिडीओमध्ये असणाऱ्या कॅब चालकाचं नाव शशिकांत गिरी असं आहे. दो रास्ते चित्रपटातील छुप गए सारे नजरे हे गाणे गाताना दिसत आहे.
मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं गिरी यांनी इतक्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना अगदी हुबेहूब गायलंय.
“संगीत आवडतं का? मग गाणं गा! ट्रॅफिक सिग्नलवर हॉर्न वाजवू नका,” असे कॅप्शन या व्हिडिओला दिल्ली पोलिसांनी दिलंय.
व्हिडीओ
How to stay calm at traffic signal.. pic.twitter.com/dcfBH5Xz5Z
— Delhi Traffic Police (@dtptraffic) September 22, 2022
व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळालेत. खूप लोकांना हा व्हिडीओ आवडलाय. हा कॅब ड्रायव्हरचा अतिशय सुंदर आहे. ट्रॅफिकमध्ये प्रवासी नक्कीच मजा करत असणारे.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं 1969 साली आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. दो रास्ते या चित्रपटात राजेश खन्ना, मुमताज, बिंदू, असित सेन, बलराज साहनी आणि प्रेम चोप्रा यांच्या भूमिका होत्या.