Video: लग्नाची तयारी करतानाही नवरीचा मॅगीवर ताव, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, आम्हालाही अशीच बायको हवी!
व्हिडिओमध्ये, वधू तयार होत असताना एका बाऊलमध्ये मॅगीचा आनंद घेताना दिसत आहे आणि जर तुम्ही फूड प्रेमी असाल तर तुम्हालाही हा व्हिडीओ खूप आवडेल.
लग्नाचा दिवस वधूसाठी सर्वात खास दिवस असतो. लग्नातील सर्व विधी पार पाडताना तिला संयम ठेवावा लागतो. मात्र, सध्या एका नववधूचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू काही उपाशी राहण्यास नकार देत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, वधू तयार होत असताना एका बाऊलमध्ये मॅगीचा आनंद घेताना दिसत आहे आणि जर तुम्ही फूड प्रेमी असाल तर तुम्हालाही हा व्हिडीओ खूप आवडेल. (desi bride enjoys Maggi before wedding viral and funny video in indian wedding)
व्हिडिओच्या सुरुवातीला वधूच्या ड्रेसमध्ये मुलगी खुर्चीवर बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करत असलेली वधूला म्हणते की चल लवकर उशीर होत आहे, वधू लगेच म्हणते – वर थांबू शकतो आणि मग ती मॅगीचा आनंद घेताना दिसते.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ theshaadiswag नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वराला वाट पाहू द्या’ सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
व्हिडिओला आत्तापर्यंत 30,000 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे आणि कमेंट सेक्शनला शेकडो लोकं व्यक्त झाले आहेत. काही लोकांना वधूचे खाणं आवडलं, तर अनेक नेटकऱ्यांनी सांगितले की ते वधूची परिस्थिती ते समजून शकतात. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘अशी वधू याआधी कधीच पाहिली नव्हती’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे माझं भविष्य आहे’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘देव सर्वांना अशी वधू देवो’ याशिवाय लोक व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर करून प्रेमाचा वर्षाव करत आहे.
हेही पाहा:
Viral: सिंहाला हात लावण्यासाठी खिडकी उघडली, आणि त्यानंतर जे झालं त्याने तुमच्या अंगावर काटा येईल!
नेपोलियन कुठल्या युद्धात मारला गेला, विद्यार्थी म्हणतो, शेवटच्या युद्धात, वाचा क्रिएटीव्ह विद्यार्थ्याची भन्नाट उत्तरं!