Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: सासरी जाताना वधूचा आनंदोत्सव, आईचेही अश्रू पुसले, नेटकरी म्हणाले, नवरी असावी तर अशी!

अनेक लग्नांमध्ये मुलीला तुम्ही रडताना पाहिलं असेल. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळंच घडताना दिसतं आहे. ही वधू रडत तर नाहीच, पण आनंद साजरा करते आहे. हेच नाही तर रडणाऱ्या आपल्या आईचे डोळेही पुसताना दिसत आहे.

Video: सासरी जाताना वधूचा आनंदोत्सव, आईचेही अश्रू पुसले, नेटकरी म्हणाले, नवरी असावी तर अशी!
सासरी जाताना हसणारी वधू
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 1:56 PM

लग्नातील नवरीला वाटी लावण्याच्या क्षणासारखा भावूक क्षण दुसरा नसतो. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होते, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. अशावेळी मुलगी भावूक झाली नाही तर नवलंच. अनेक लग्नांमध्ये मुलीला तुम्ही रडताना पाहिलं असेल. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळंच घडताना दिसतं आहे. ही वधू रडत तर नाहीच, पण आनंद साजरा करते आहे. हेच नाही तर रडणाऱ्या आपल्या आईचे डोळेही पुसताना दिसत आहे. (Desi bride viral video from her vidaai will leave you in splits Watch)

इशिता ठुकराल नावाने ओळखली जाणारी नववधू विदाईचा विधी पार पाडताना असे काही बोलते जी ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ हॅप्पीफ्रेम्सने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ पाहा:

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, इशिता ठुकराल तिच्या चेहऱ्यावर हसू घेऊन लग्नाचे विधी करताना दिसत आहे. यादरम्यान ती असेही म्हणते – मला सध्या रडू येत नाही. माझा मेकअप खराब होईल, मला परत फोटो क्लिक करावी लागतील. आईचे अश्रू पुसताना तिचे हे शब्द निरोपाच्या वेळेचे आहेत. कदाचित याआधी इतका सुंदर विदाईचा व्हिडीओ पाहिला नसेल.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सध्या, तुम्ही roll_camera_dance पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यासोबतच प्लॅटफॉर्मवर व्हिडिओही शेअर केला जात आहे. जिथे युजर्स त्यांच्या मजेदार कमेंट्सद्वारे भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा:

Video: “माणिके मागे हिते”वर भन्नाट बेली डान्स, डान्सरच्या अदांवर नेटकरी घायाळ

Video: आधी पोराला मार मग त्याच्यासोबतच भन्नाट डान्स, बाप-लेकाचा नात्यातील ओलावा दाखवणारा व्हिडीओ