एका मोटरला तीन पंखे! जुगाड असावा तर हा असा…
या व्हिडिओचं कौतुक अगदी परदेशातल्या लोकांनी सुद्धा केलं होतं. जुगाड तंत्रज्ञानाचे व्हिडीओ इंटरनेटवर बरेच व्हायरल होत राहतात. आपल्याकडे लोकांना जुगाड लावण्यात अत्यंत रस आहे. जुगाड करताना स्वस्तात मस्त गोष्टी बनवल्या जातात.
मुंबई: देसी जुगाडचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात एका कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरांनी काम करण्यासाठी एक भन्नाट जुगाड केला होता. या व्हिडिओचं कौतुक अगदी परदेशातल्या लोकांनी सुद्धा केलं होतं. जुगाड तंत्रज्ञानाचे व्हिडीओ इंटरनेटवर बरेच व्हायरल होत राहतात. आपल्याकडे लोकांना जुगाड लावण्यात अत्यंत रस आहे. जुगाड करताना स्वस्तात मस्त गोष्टी बनवल्या जातात. अगदी कमी पैशात डोकं लावून हे केलं जातं. अनेकदा असे व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्यासारखे लोकं सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करतात.
एक पोस्ट व्हायरल होतेय ज्यात पंख्याचा जुगाड करण्यात आलाय. यात एका मोटरला तब्बल ३ फॅन जोडण्यात आलेत. आता तुम्ही म्हणाल एका मोटारला ३ पंखे कसे? ये इंडिया है भाई, यहा कुछ भी हो सकता है! ही पोस्ट लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलीये. ‘शैलेंद्र बिहारी’ या फेसबुक हँडलवरून ३ जुलै रोजी हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – बिहारचे इंजिनिअर्स हे एकमेव इंजिनिअर्स आहेत जे एका मोटारवर तीन पंखे चालवू शकतात.
आता हा फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. या भन्नाट जुगाडला आतापर्यंत ६७ हजार प्रतिक्रिया आणि अडीच हजारांहून अधिक शेअर्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. जिथे काही युजर्सनी लिहिले की, भाईला या कामासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे. तर इतर युजर्सनी जुगाड खरोखरच प्रभावी असल्याचं म्हटलं आहे.