Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनुभाई मोटर चली पम पम! जुगाड करून बनवली गाडी, व्हिडीओ व्हायरल

Desi Jugaad: वाहनांच्या बाबतीत जुगाडचे अनेक प्रकार आहेत. यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं. ज्यामध्ये मोटारसायकलपासून बनवलेल्या जुगाड कारवर नऊ जण बसलेले दिसत होते. आता या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मनुभाई मोटर चली पम पम! जुगाड करून बनवली गाडी, व्हिडीओ व्हायरल
Desi Jugad
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 11:28 AM

मुंबई: गरज ही आविष्काराची जननी आहे असं म्हटलं जातं. ही म्हण आपण भारतीय अगदी अचूकपणे पाळतो. आपण असा देशी जुगाड शोधून काढतो की जे कुणाला सुचत नाही. वाहनांच्या बाबतीत जुगाडचे अनेक प्रकार आहेत. यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं. ज्यामध्ये मोटारसायकलपासून बनवलेल्या जुगाड कारवर नऊ जण बसलेले दिसत होते. आता या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बाराबंकी शहरातून जाणाऱ्या लखनौ-अयोध्या महामार्गावर हे वाहन दिसले. ही दुचाकी एक व्यक्ती चालवताना दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी किमान आठ जण बसले होते. समोरच्या दुचाकीवर तीन जण बसले होते, तर इतर पाच जण लाकडी गाडीवर आरामात मागच्या बाजूला बसले होते. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. साधारणपणे नऊ जण गाडीत बसू शकतात. ही गाडी जुगाड करून जरी बनवली असली तरी ती धोकायदायक नाही. त्यामुळे यावर कुणीही सहज बसू शकतं.

बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने जुनी बाईक अशी रिमॉडिफाई केली आहे की ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. बाईकमध्ये सायलेंसर आहे जो इतका मोठा आवाज करतो की बाईक चालवताना हॉर्न वाजवण्याची गरज भासत नाही. ही भन्नाट गाडी प्रचंड व्हायरल होतीये. तुम्हालाही ही गाडी नक्की आवडेल.

घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.