मुंबई: गरज ही आविष्काराची जननी आहे असं म्हटलं जातं. ही म्हण आपण भारतीय अगदी अचूकपणे पाळतो. आपण असा देशी जुगाड शोधून काढतो की जे कुणाला सुचत नाही. वाहनांच्या बाबतीत जुगाडचे अनेक प्रकार आहेत. यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं. ज्यामध्ये मोटारसायकलपासून बनवलेल्या जुगाड कारवर नऊ जण बसलेले दिसत होते. आता या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बाराबंकी शहरातून जाणाऱ्या लखनौ-अयोध्या महामार्गावर हे वाहन दिसले. ही दुचाकी एक व्यक्ती चालवताना दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी किमान आठ जण बसले होते. समोरच्या दुचाकीवर तीन जण बसले होते, तर इतर पाच जण लाकडी गाडीवर आरामात मागच्या बाजूला बसले होते. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. साधारणपणे नऊ जण गाडीत बसू शकतात. ही गाडी जुगाड करून जरी बनवली असली तरी ती धोकायदायक नाही. त्यामुळे यावर कुणीही सहज बसू शकतं.
गाड़ी का देसी जुगाड़ #DesiJugaad pic.twitter.com/mlTDv6MYqo
— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) June 14, 2023
बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने जुनी बाईक अशी रिमॉडिफाई केली आहे की ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. बाईकमध्ये सायलेंसर आहे जो इतका मोठा आवाज करतो की बाईक चालवताना हॉर्न वाजवण्याची गरज भासत नाही. ही भन्नाट गाडी प्रचंड व्हायरल होतीये. तुम्हालाही ही गाडी नक्की आवडेल.