Desi Jugad | अरुंद रस्त्याला शक्कल लढवून केलं रुंद, चारचाकी वाचली! Video Viral
एक चारचाकी डोंगराळ भागात गेल्यावर एका अरुंद रस्त्यावर अडकते. आता रस्ताच जर अरुंद असेल तर काय केलं जाऊ शकतं? कोणता जुगाड या चारचाकीला या संकटातून वाचवू शकतो? तिथे काही लोकं येतात आणि चारचाकी वाल्याला वाचवतात. कसं? ते पहा
मुंबई: आपल्याकडे सगळ्यात भारी जर कोणतं तंत्रज्ञान असेल तर ते आहे जुगाड तंत्रज्ञान! भारतातले जुगाड पाहिले तर ते पाहून इथले मोठमोठे इंजिनिअर्स सुद्धा डोक्याला हात लावतील. जुगाड! जुगाड म्हणजे भारतीय लोकांसाठी सर्वस्व आहे. आपण फार खर्चाच्या भानगडीत पडत नाही. जी गोष्ट जुगाड करून होत असेल त्या गोष्टीसाठी आपण वेळ, पैसा, ऊर्जा यातलं काहीही घालवत नाही. आपण जरासं डोकं लावतो. गोष्टींची जुळवाजुळव करतो, थोडा हटके विचार करतो आणि जुगाड करून आपण आपलं काम काढून घेतो. कोण बघायला येणार आहे की काम कसं झालं आहे? काम झालं आहे हे महत्त्वाचं नाही का? असे अनेक जुगाडचे व्हिडीओ आहेत जे मोठमोठ्या लोकांकडून सोशल मीडियावर शेअर केले जातात. अगदी आनंद महिंद्रा यांच्या सारख्या व्यक्तीला सुद्धा जुगाड तंत्रज्ञांचं अप्रूप वाटतं.
गाडी खालीच कोसळणार
आता हा व्हिडीओ बघा. या व्हिडीओ मध्ये एक चारचाकी अडकली होती. डोंगराळ भागात गाडी चालवताना अनेक अडचणी येतात मग ती दुचाकी असो की चारचाकी. या व्हिडीओमध्ये एक चारचाकी एका निमुळत्या रस्त्यावर अडकलीये. त्या गाडीला पुढे जाण्यासाठी चांगला रस्ताच नाही. रस्ता नाही म्हणजे काय? रस्ता छोटा आहे, निमुळता आहे. गाडी जर पुढे गेली तर गाडी खाली पडू शकते कारण संपूर्ण गाडी या रस्त्यावर चालू शकेल असा हा रस्ता नाहीच, अरुंद रस्ता! आता ही गाडी ना पुढे जाऊ शकते आणि ना मागे येऊ शकते. का? कारण गाडीने कशीही हालचाल केली तरी गाडी खालीच कोसळणार आहे.
पहाड़ी हैं भाई जिगरे के साथ जुगाड भी मोटा रखते हैं । pic.twitter.com/jxCAxfDjVO
— Rishu🇮🇳 (@Rishusharma26) August 30, 2023
व्हिडीओ बघून वाटेल खूप कौतुक
व्हिडीओ बघा. तिथे काही लोकं या गाडीचालकाची मदत करायला येतात. ते एक जुगाड लावतात. इतकं मस्त डोकं लावतात की बास. अरुंद रस्त्यावरून गाडी पुढे सरकवण्यासाठी ते रस्ताच रुंद करतात. पण कसा? अहो इथेच तर येतोय ना जुगाड! ते खांद्यावर एक प्लायवुड घेतात. हे प्लायवुड ते त्या अरुंद रस्त्याला लावतात आणि रस्ता रुंद करतात. आता चारचाकीची दोन चाकं रस्त्यावर आणि उरलेली दोन त्या प्लायवुडवर! असं करत करत गाडी आरामात त्या जागेवरून पुढे सरकते. हा व्हिडीओ बघून तुम्हाला खूप कौतुक वाटेल. या व्हिडिओला कॅप्शन दिलंय, “पहाड़ी हैं भाई जिगरे के साथ जुगाड भी मोटा रखते हैं ।”