Video : ‘टिप-टिप बरसा पाणी’वर थिरकले धनश्री आणि युझवेंद्र चहल, काश्मीरमधील व्हिडिओ व्हायरल

. युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री सध्या काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. काश्मीवरमध्ये बर्फवृष्टी होत असताना धनश्री या गाण्यावर चक्क बर्फात डान्स करत आहे.

Video : 'टिप-टिप बरसा पाणी'वर थिरकले धनश्री आणि युझवेंद्र चहल, काश्मीरमधील व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:07 PM

मुंबई : भारताचा स्पिनर युझवेंद्र चहल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह असतो, त्याची पत्नी धनश्रीही उत्तम डान्सर आहे, तिच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे अनेक क्रिकेटर्ससोबतचे डान्सचे व्हिडिओही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. आता मात्र धनश्रीने शेअर केलेला व्हिडिओ काश्मीरच्या बर्फातला आहे.

‘टिप-टिप बरसा’वर धनश्री थिरकली

टिप-टिप बरसा पाणी हे प्रचंड गाजलेले गाणे आहे. त्यावर अनेकजण रिल्स बनवतात. युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री सध्या काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. काश्मीवरमध्ये बर्फवृष्टी होत असताना धनश्री या गाण्यावर चक्क बर्फात डान्स करत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये शूट केला आहे. काश्मीर हे त्याच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तिथे अनेक पर्यंटक बर्फवृष्टी अनुभवायला येत असतात. धनश्री आणि युझवेंद्रही काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत.

स्वर्गासारखे काश्मीरचे सौदर्य, धनश्रीचे कॅप्शन

टिप-टिप बरसा…स्नो…खरं सांगायचं झालं तर सौंदर्य हे स्वर्गासारखे आहे. माफ करा साडीमध्ये डान्स नाही केला…असे कॅप्शन धनश्रीने या व्हिडिओला दिले आहे. टिप-टिप बरसा हे गाणं साडीत डान्स करून रविना टंडनने आधीच प्रचंड लोकप्रिय बनवले आहे. याचवर्षी त्या गाण्याचा रिमेक आला आहे. ज्यात कतरीना कैफ साडीत पावसात थिरकताना दिसून आली आहे. त्यामुळेच या गाण्याची पुन्हा चर्चा आहे. युझवेंद्र चहलचे साऊथ आफ्रिके विरुद्धच्या वनडे स्कॉडमध्येही सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. मात्र तुर्तास तरी तो पत्नीसोबत काश्मीरच्या सौंदर्याचा आणि बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसून येत आहे. या व्हिडिओला लाईक्सचा पाऊस पडला आहे. धनश्री आणि युझवेंद्रचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, त्यामुळे ही जोडी नेहमीच चर्चेत असते.

Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर

83 Box Office Collection Day 2 : ख्रिसमसला चालली रणवीर सिंगची जादू, दुसऱ्या दिवशीही83ची जबरदस्त कमाई

Smriti Irani | क्योंकि बहू भी अभी सास बनने वाली है… केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीची एंगेजमेंट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.