राजाला राणी सव्वाशेर, 3 बॉडीगार्डसोबत संबंधांचा धुराळा, 5 हजार कोटीच्या घटस्फोटाची ‘आतली’ गोष्ट

तब्बल 5 हजार 500 कोटी रुपयांची पोटगी या घटस्फोटात दुबईच्या राणी देण्यात आली. याच राणीची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ही तीच राणी आहे, जिच्या अनैतिक संबंधांची सप्टेंबर महिन्यात तुफान चर्चा झाली होती.

राजाला राणी सव्वाशेर, 3 बॉडीगार्डसोबत संबंधांचा धुराळा, 5 हजार कोटीच्या घटस्फोटाची 'आतली' गोष्ट
राजा-राणीचा घटस्फोट, पण त्यामागीच गोष्ट खतरनाकच आहे (Photo - Google)
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 5:11 PM

नुकत्याच झालेल्या एका महागड्या घटस्फोटाची बातमी तुम्ही वाचली असलेच! नसेल वाचली तर ती तुम्हाला इथे वाचता येईल. तब्बल 5 हजार 500 कोटी रुपयांची पोटगी या घटस्फोटात दुबईच्या राणी देण्यात आली. याच राणीची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ही तीच राणी आहे, जिच्या अनैतिक संबंधांची सप्टेंबर महिन्यात तुफान चर्चा झाली होती. या चर्चा थांबवण्यासाठी ज्याच्यासोबत राणीनं अनैतिक संबंध ठेवले होते, त्याला तब्बल 50 लाख रुपयांची बंदूक, 12 लाख रुपयांचं घड्याळ यासोबत महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या होत्या. पण ही गोष्ट काही लपून राहिली आहे. अखेर जे समोर यायचं होतं, ते आलंच!

घटस्फोटाचं मूळ अनैतिक संबंधच

दुबईच्या या राणीचं नाव आहे दया बिंत अल हुसैन. घटस्फोटानंतर त्यांना 5 हजार 500 रुपयांची पोटगी मिळणार आहे. मुलांच्या ताब्यावरुन जॉर्डनचे राजकुमार तसंच यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशिद अल मख्तुम यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. पण त्याआधीच या राणीच्या अनैतिक संबंधाची चर्चा हे या घटस्फोटाच्या वादाचं मूळ कारणं असल्याचीही चर्चा ऐकायला मिळतेय.

अनैतिक संबंधाची आतली गोष्ट

या राणीनं आपल्यासोबत एक दोन नाही तर तब्बल तीन बॉडीगार्डसोबत अनैतिक संबंध ठेवले असल्याची कुजबूज सुरु झाली होती. त्यानंतर राणीनं रसेल फ्लावर नावाच्या एका बॉडीगार्डला ही गोष्ट न सांगण्यासाठी लाखो रुपयांची महागडी घड्याळं आणि बंदुका दिल्या. तब्बल 12 लाखाचं घड्याळ आणि 50 लाख रुपयांची बंदूक राणीनं या बॉडीगार्डला दिली असल्याचं वृत्तदेखील एका ब्रिटिश दैनिकानं दिलं होतं. आपण ठेवलेल्या अनैतिक संबंधांमुळे राजा आपल्याला सोडून देईल, आपला मान-सन्मान, प्रतिष्ठा संपून जाईल, अशी भीती राणीला वाटत होती. मात्र अखेर प्रकरण उघडकीस आल्यानंतर राणीनं 2019मध्ये राजाला घटस्फोट दिला होता.

आता कुठंय राणी?

घटस्फोटानंतरही कोर्टासमोर राजा आणि राणी यांच्यातील वाद सुरु होता. मुलांच्या ताब्यावर हा वाद ब्रिटनमधील एका कोर्टात सुरु होता. अखेर याप्रकरणी निर्णय देताना ब्रिटनमधील कोर्टानं दुबईच्या राजाला थोडीथोडकी नाही तर तब्बल 5 हजार 500 कोटी रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. ब्रिटनच्याा भाषेत बोलायचे तर तब्बल 554 मिलीयन पाऊंड इतकी पोटगी राजाला द्यावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ही राणी ब्रिटनमध्येच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. बॉडीगार्ड रसेलसोबत अनैतिक शरीर संबंध ठेवण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर राजा आणि राणी एकमेकांपासून विभक्त झालेत.

इतर बातम्या –

Perfect Bra Tips: प्रत्येक मुलीला माहिती पाहिजे ब्रा बद्दलचे ‘हे’ नियम! जाणून घेऊयात बेसिक माहिती

Best tourist destinations near Pune | पुण्यापासून 150 किमीच्याआता असलेल्या या आठ पर्यटनस्थळांना भेट द्या ; नवीन वर्षाचे जलोषात स्वागत करा

Pregnancy Problems | प्रसुतीनंतर ताप येतोय, घाबरण्यांचं कारण नाही! जाणून घ्या काय आहेत कारणं…

सीलबंद पाण्याची ‘एक्स्पायरी’ तपासली का? जाणून घ्या महत्वाची कारणे

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.