ओहो! डिजिटल इंडिया, पूजा करताना खरी घंटी नव्हती म्हणून
या क्लिपला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी "अप्रतिम" लिहिलं. एकाने लिहिलं, "डिजिटल इंडिया".
तंत्रज्ञान हा माणसाने घडवून आणलेला अविष्कार आहे. आता माणसाने घडवलाय म्हणजे अर्थातच माणूस हवा तसा त्याचा वापर करू शकतो. वेळेच्या बचतीसाठी, कामाच्या सोयीसाठी तंत्रज्ञान अनेक ठिकाणी वापरलं जातं. पण कधी विचार केला होता का की देवाची पूजा करताना सुद्धा याचा वापर होऊ शकतो? अनेक कार्यक्रमांनी किंवा अनेकवेळा पूजा करताना सुद्धा आता माणूस फोनवरच आरती लावतो. आता म्हणेल ती आरती म्हणेल त्या म्युजिक मध्ये ऑनलाइन उपलब्ध असते. अक्षरशः कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असल्यास तंत्रज्ञान आपल्याला ते पुरवू शकतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक पुजारी चक्क देवाची घंटी उपलब्ध नाही म्हणून फोनवर ऑनलाइन लावतोय.
हा व्हिडीओ बघून तुम्ही प्रचंड हसाल. आजपर्यंत आपण पूजा करताना आरत्या लावल्या असतील. अनेक गोष्टी आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने करतो. या पुजाऱ्याने तर देवाची घंटी सापडली नाही म्हणून तंत्रज्ञानाचा वापर केलाय.
तंत्रज्ञानाचा असा वापर कधीच पाहिला नव्हता. होय, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून जनता हैराण झाली आहे. ब्योमकेश (@byomkesbakshy) या ट्विटर युजरने ४ फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले: “तंत्रज्ञानाचा अद्भुत वापर!!”
Tecnology ka adbhut upyog!! ?? pic.twitter.com/RyyxzWQZuY
— Byomkesh (@byomkesbakshy) February 4, 2023
यामध्ये एक तरुण जमिनीवर बसून पूजा करताना दिसत आहे. त्याच्याकडे वाजवायला खरी घंटा नव्हती, म्हणून त्या माणसाने तंत्रज्ञानाचा अप्रतिम वापर केला. होय, त्याने मोबाईलमधील ॲप उघडून चालू केले, त्यानंतर ही घंटी वाजत राहिली आणि ती व्यक्ती मंत्रोच्चार करत राहिली.
या क्लिपला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी “अप्रतिम” लिहिलं. एकाने लिहिलं, “डिजिटल इंडिया”.