Video : ….आणि दिनेश कार्तिक थेट ड्रेसिंग रुममध्ये नाचायला लागला
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू दिनेश कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे (Dinesh Karthik dance Video viral on social media).
चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू दिनेश कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिनेश कार्तिक ठुमका लावताना दिसत आहे. त्याच्यासोबत इतर आणखी काही खेळाडू नृत्य करताना दिसत आहेत. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडीओला क्रिकेट चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे (Dinesh Karthik dance Video viral on social media).
सय्यत मुश्ताक अली राष्ट्रीय टी 20 टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात रविवारी (31 जानेवारी) तामिळनाडूने बडोदाचा सात विकेट्सने पराभव केला. विशेष म्हणजे तामिळनाडूने दुसऱ्यांदा ही टुर्नामेंट जिंकली. या संघाचं नेतृत्व दिनेश कार्तिक करत होता. दिनेशने एक कर्णधार आणि फिनिशर म्हणून खूप चांगली कामगिरी केली. बडोदाने दिलेल्या 121 धावांच्या माफक आव्हांना तामिळनाडूने सहज पूर्ण केलं. बडोदाच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूचा फलंदाज निशांतने 35, बाबा अपराजितने नाबाद 29 तर दिनेश कार्तिकने 22 धावा केल्या.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर तामिळनाडूच्या खेळाडूंनी ड्रेसिंगरुममध्ये आनंद व्यक्त केला. त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड जोमात आणि उत्साहात डान्स केला. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ बनवला. या व्हिडीओत संपूर्ण टीम दिनेश कार्तिक सोबत ठुमका देताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे (Dinesh Karthik dance Video viral on social media).
VAATHI COMING, OTHTHEY!! BAAIS VERA MAAARI CELEBRATION AFTER THE #SMA2021 WIN! ???? pic.twitter.com/zWemnK2CHU
— Srini Mama (@SriniMaama16) January 31, 2021