कर्मचाऱ्याला टक्कल म्हणून नोकरीवरून काढलं, बॉस विरोधात कोर्टात! कोर्टाकडून हा निर्णय
एका बॉसने आपल्या एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर केस नाहीत, त्याला अशा कर्मचाऱ्याची गरज नाही आणि तो टकला आहे असं सांगून त्याला कामावरून काढून टाकलं.
अनेकदा जगभरातील कंपन्यांचे बॉस आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित केसेस समोर येतात. त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाते आणि नोकऱ्या दिल्या जातात. पण नुकतंच एक अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण समोर आलं आहे जेव्हा एका बॉसने आपल्या एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर केस नाहीत, त्याला अशा कर्मचाऱ्याची गरज नाही आणि तो टकला आहे असं सांगून त्याला कामावरून काढून टाकलं. ही घटना ब्रिटनच्या लीड्समधील आहे. एका ब्रिटीश मीडिया रिपोर्टनुसार, बॉसचे नाव फिलिप आणि कर्मचाऱ्याचे नाव मार्क आहे. बॉसला 50 वर्षांच्या टक्कल असणाऱ्या माणसांची टीम नको होती. उत्साही आणि तरुणांनी येथे काम करावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच एवढा मोठा निर्णय घेत त्याने मार्कला नोकरीवरून काढून टाकले.
रिपोर्ट्सनुसार, फिलिप स्वत: टकला आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. पण असे असतानाही त्याने एका टक्कल असणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले. मार्कने आणखी एक युक्तिवाद केला की त्याला मुद्दाम काढून टाकण्यात आले कारण जर तो तेथे दोन वर्षे राहिला असता तर त्याला कर्मचाऱ्यासह पूर्ण अधिकार मिळाले असते
या घटनेनंतर त्यांनी कायदेशीर बाजूचा विचार करून न्यायालयात धाव घेतली आणि बॉससह कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की, केवळ टक्कल आहे म्हणून कोणालाही नोकरीवरून काढून टाकता येणार नाही. कोर्टाने बॉस आणि कंपनीच्या वतीने 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मार्क कंपनीत संचालक म्हणून काम करत होते आणि त्यांचे वार्षिक वेतन 60 लाख रुपये होते.