Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | जेव्हा एक जज टोल द्यायला नकार देतो, देश का चर्चा करतोय ह्या क्लिपची?

टोल प्लाजावर (Toll Plaza) टोल टॅक्स न देण्यावरुन दररोज एक नवा वाद समोर येतो (District Court Judge Refuse To Pay Toll Tax).

VIDEO | जेव्हा एक जज टोल द्यायला नकार देतो, देश का चर्चा करतोय ह्या क्लिपची?
Toll-plaza
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 12:34 PM

मुंबई : टोल प्लाजावर (Toll Plaza) टोल टॅक्स न देण्यावरुन दररोज एक नवा वाद समोर येतो (District Court Judge Refuse To Pay Toll Tax). बडे लोक आपल्या ओळखपत्राचा, आपल्या स्टेटसचा वापर करुन टोल टॅक्स न भरता निघण्याचा प्रयत्न करतात. टोल टॅक्स कोणाकोणासाठी फ्री असेल याची संपूर्ण यादी टोल नाक्यावर असते. यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, आमदार, खासदार, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टसह अनेक लोकांना सूट मिळते. आता टोल नाक्यावर आपल्या पदाचा वापर करणाऱ्या एका जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशाचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ बरेली आणि मुरादाबादअंतर्गत येणाऱ्या टोल नाक्यावरील आहे. हा व्हिडीओ सहा महिने जुना आहे, पण तो सध्या व्हायरल होतो आहे (District Court Judge Refuse To Pay Toll Tax Manager Told Him Rules And Took Toll).

पाहा व्हिडीओ –

नियम पाळावेच लागतील

आपल्या पदाचा जोर दाखवणाऱ्या जिल्हा न्यायाधिशाला टोल प्लाजाच्या एका कर्मचाऱ्याने नियमांचे धडे गिरवले. टोल नाक्यावर जेव्हा जिल्हा न्यायाधीश पोहोचले, तेव्हा त्यांनी आपली ओळख दाखवली आणि विना टोल देता निघू लागले. पण, मॅनेजरने त्यांना टोल देण्यास सांगितलं. जेव्हा ते जिद्द करु लागले, तेव्हा मॅनेजरनेही त्यांना टोल देण्यासाठी सज्जड दम दिला. मॅनेजरने म्हटलं की, टोल टॅक्स न्यायाधिशांसाठी मोफत नाहीये. पण, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जस्टिससाठी आहे. तुम्ही जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आहात तुम्हाला ही सुविधा नाही मिळणार. पण, न्यायाधीश ऐकायला तयार नव्हते.

त्यानंतर टोल कर्मचाऱ्याने सांगितलं की नियम पाळावेच लागतील. विना पैसे देता तुम्हाला पुढे जाऊ दिलं जाणार नाही, जर तुम्ही असेच इथे थांबलात तर तुमच्यावर लेन जाम करण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

राजस्थान आणि मध्यप्रदेशातही टोल टॅक्स दिला नाही

न्यायाधीशाने सांगितलं की ते राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या यात्रेवरुन येत आहेत. त्यांनी रस्त्यात कुठेही टोल टॅक्स दिला नाही. यावर टोल मॅनेजरने म्हटलं, म्हणजे तुम्ही आतापर्यंत अधिकारांचा चुकीचा वापर केला आहे. न्यायालय नियमापेक्षा मोठं नाही. 80 रुपये टोल आहे, तो द्या आणि जा. त्यामुळे अखेर न्यायाधीशांना टोल द्यावा लागला.

District Court Judge Refuse To Pay Toll Tax Manager Told Him Rules And Took Toll

संबंधित बातम्या :

ट्रेनमध्ये झोपल्यास रेल्वे आकारणार अतिरिक्त 10 टक्के भाडे? जाणून घ्या काय आहे सत्य?

VIDEO | पाठलाग करणाऱ्या मुलाला भर रस्त्यात फटके, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल

VIDEO : ड्रायव्हर नव्हे रायडर…. या ट्रक ड्रायव्हरची करामत पाहाच

Goat Selfie Viral Video | बकरीला सेल्फी नाही रुचली, थेट शिंगेच तरुणीला टोचली

सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.