मुलीचा DNA वडिलांशी मॅच झाला नाही, इतर कुणाशीही संबंध नसल्याचा महिलेचा दावा! धक्कादायक
पतीला भेटल्यानंतर इतर कोणत्याही पुरुषासोबत आपले प्रेमसंबंध नसल्याचा दावा या महिलेने केला आहे.
एका आईने आपल्या मुलीची DNA चाचणी करून घेतली आणि त्याचा परिणाम ऐकून तिला धक्काच बसला. आपली मुलगी आपल्या इतर मुलांपेक्षा वेगळी असल्याचं जेव्हा या महिलेच्या लक्षात आलं तेव्हा तिने ही टेस्ट करून घ्यायचा निर्णय घेतला. डीएनए रिपोर्ट वेगळा आला. या महिलेचे लग्नानंतर इतर कोणत्याही व्यक्तीशी आपले संबंध नव्हते, त्यामुळे मुलीचा वेगळा डीएनए आल्यानं ती नाराज आहे, असा दावा या महिलेने केला आहे.
हे प्रकरण घाना येथील आहे. या महिलेने आपली ओळख उघड केलेली नाही. त्यांनी आपल्या मुलीची गुप्त डीएनए चाचणी केली होती. टेस्ट रिपोर्टनुसार, मूल तिचं आहे, पण तिचा नवरा त्या मुलीचा बाप नाही.
पतीला भेटल्यानंतर इतर कोणत्याही पुरुषासोबत आपले प्रेमसंबंध नसल्याचा दावा या महिलेने केला आहे. अशा परिस्थितीत मुलीचा डीएनए रिपोर्ट पाहिल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
महिलेचे म्हणणे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी असं म्हटलं की, पतीशी प्रामाणिक राहून सुद्धा असं होऊ शकतं मुलाचा डीएनए वेगळा असू शकतो.
एका युझरने लिहिले- माझा या महिलेवर विश्वास आहे की, तिचे पतीशिवाय इतर कोणाशीही संबंध नव्हते. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलामध्ये फक्त एका पालकाचे डीएनए असण्याची शक्यता असते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
आणखी एका युझरने लिहिले – महिलेनेही प्रसूती डीएनए चाचणी करून घ्यावी. Legit.NG एका रिपोर्टनुसार, महिलेने घानाचे प्रसिद्ध फेसबुक इन्फ्लुएन्सर डेव्हिड बॉन्ड्ज-एम्बर यांना हे सगळं सांगितलं. ही घटना डेव्हिडने फेसबुकवरही शेअर केली. ही पोस्ट सुद्धा व्हायरल झालेली आहे.