जगातलं सर्वात सर्वात जुनं झाड! माहितेय? किती वर्षांचं असेल अंदाजे? वाचा…
झाडाचे वय नमूद केलेल्या वयापेक्षा कमी असण्याची शक्यता फक्त 20% आहे असं जोनाथन म्हणतात.
चिलीच्या दक्षिण भागात अलेर्स कोस्टेरो नॅशनल पार्क नावाचे एक राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात जगातील सर्वात जुना वृक्ष आहे. हा वृक्ष सायप्रसचा वृक्ष आहे. शास्त्रज्ञांनी या झाडाला एक अतिशय रंजक नाव दिलं आहे. वैज्ञानिक या झाडाला ग्रेट गैंडफादर (Great Grandfather) म्हणतात. तुम्हालाही निसर्गाबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर तुम्हालाही या झाडाचा इतिहास आवडेल.
पर्यावरणशास्त्रज्ञ जोनाथन बारिचेविच यांच्या मते, या झाडाचे वय 5,484 वर्षे आहे. या प्रजातीची (Cypress) झाडे नामशेष होत आहेत.
शास्त्रज्ञांनी संगणकाच्या मॉडेल्सचा वापर करून या झाडाचा संपूर्ण इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला, जो खरोखर मनोरंजक आहे.
या झाडाच्या वर शेवाळ, बुरशीसह काही लहान झुडपे (हिरवळ) देखील दिसून येतात. जोनाथन म्हणतात की, या झाडाची सुमारे 80% विकासाबाबतची माहिती मी काढलीये.
झाडाचे वय नमूद केलेल्या वयापेक्षा कमी असण्याची शक्यता फक्त 20% आहे असं जोनाथन म्हणतात. या वृक्षाचे खोड बऱ्यापैकी जाड आहे. हा वृक्ष पृथ्वीवर असलेल्या सर्व झाडांपैकी सर्वात जुना वृक्ष आहे.
या झाडाने कॅलिफोर्नियाच्या ब्रिस्टलकॉन पाइन वृक्षाचा (ज्याला मेथुसेला म्हणतात) पराभव केला आणि सर्वात जुन्या झाडाचा किताब जिंकला. ट्री रिंग लॅबोरेटरीच्या संचालकांच्या मते, जोनाथन यांनी ज्या तंत्राने या झाडाचे वय मोजले ते जवळजवळ बरोबर आहे.