पेशंट राहिला बाजूला, ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टरांची बाचाबाची! VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑपरेशन थिएटरमधील काही डॉक्टर एका पेशंटवर शस्त्रक्रिया करत आहेत आणि अचानक दोन डॉक्टरांमध्ये वाद होतो.
जगभरातील लोक डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानतात, कारण लोकांचा असा विश्वास आहे की देवानंतर फक्त डॉक्टर आहेत जे लोकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र, डॉक्टर रुग्णाकडे लक्ष देण्याऐवजी भांडू लागले तर? तेही ऑपरेशनच्या वेळी? मग मात्र तुम्हाला धक्का बसेल नाही? कारण असं काही क्वचितच होतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आलाय, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. पेशंटला ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं तेव्हा आत डॉक्टर खूप गांभीर्याने ऑपरेशन करत असावेत असं आपल्याला वाटतं, पण एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो.
ऑपरेशन थिएटरमध्ये काय होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण ऐकत आलो आहोत की, डॉक्टरांची टीम पेशंटवर शस्त्रक्रिया करते आणि बाकीचे त्यांच्या मदतीसाठी एकत्र उभे राहतात.
इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. होय, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑपरेशन थिएटरमधील काही डॉक्टर एका पेशंटवर शस्त्रक्रिया करत आहेत आणि अचानक दोन डॉक्टरांमध्ये वाद होतो.
यानंतर दोघेही एकमेकांशी भांडतात आणि एकमेकांशी वाद घालू लागतात. हे सर्व सुरु असतानाच एक जण ऑपरेशन थिएटरच्या आत आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने सर्व काही रेकॉर्ड करतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुग्ण स्ट्रेचरवर पडलेला आहे आणि डॉक्टरांसह संपूर्ण टीम त्याच्याभोवती उभी आहे आणि मग अचानक संतापतात. या दोन्ही डॉक्टरांमध्ये अचानकच वाद सुरु होतो.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. आतील लाइव्ह फुटेज समोर आल्यावर लोक हैराण झाले. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
राजकोट मिरर न्यूजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका युजरने लिहिले की, ‘असा व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद कॅमेरामन. मात्र, हा व्हायरल व्हिडिओ कुठला आणि केव्हाचा आहे, याची माहिती मिळू शकली नाही आणि आम्ही सुद्धा या व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही.