अबब… महिलेच्या पोटातली गाठच 47 किलोची? अहमदाबादमधल्या डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न!

अहमदाबादमधील (Ahmedabad) अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून 47 किलोची गाठ (47 Kg Tumor) काढून तिला एक प्रकारे नवजीवनच दिले आहे. या गाठीचे वजन महिलेच्या वजनाच्या जवळपास दुप्पट होते. शस्त्रक्रियेनंतर महिलेचे वजन केवळ 49 किलो इतके झाले.

अबब... महिलेच्या पोटातली गाठच 47 किलोची? अहमदाबादमधल्या डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न!
महिलेचा पोटातून तब्बल 47 किलोची गाठ डाॅक्टरांनी काढली
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 2:37 PM

मुंबई : अहमदाबादमधील (Ahmedabad) अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून 47 किलोची गाठ (47 Kg Tumor) काढून तिला एक प्रकारे नवजीवनच दिले आहे. या गाठीचे वजन महिलेच्या वजनाच्या जवळपास दुप्पट होते. शस्त्रक्रियेनंतर महिलेचे वजन केवळ 49 किलो इतके झाले. जेव्हा त्या महिलेला ऑपरेशन (Operation) थिएटरमधून बाहेर काढण्यात आले, तेव्हा तिला वाटले की तिच्या शरीरावरचे मोठे ओझे काढून टाकले गेले आहे.

महिलेच्या पोटातून 47 किलोची गाठ काढण्यात यश

अपोलो हॉस्पिटल्सचे सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. चिराग देसाई म्हणाले की, “शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे वजन करणे कठीण होते, कारण ती नीट उभीही राहू शकत नव्हती. मात्र ऑपरेशननंतर महिलेचे वजन 49 किलो इतके कमी झाले. डॉक्टर देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गाठीसह काढलेल्या भागाचे वजन महिलेच्या वजनापेक्षा खूप जास्त होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या महिलेच्या मोठ्या मुलाने सांगितले की, त्याची आई 18 वर्षांपासून या गाठीसोबत राहत होती. सुरवातीला ही गाठ इतकी मोठी नव्हती. पण नंतर तिचा आकार झपाट्याने वाढू लागला.

इथे पाहा महिलेच्या गाठीचा फोटो! 

woman

कोरोनामुळे दोन वर्षे या महिलेला दवाखाण्यात घेऊन जाणे शक्य नसल्याचे महिलेच्या मुलाने सांगितले. या काळातच ही गाठ दुप्पट मोठी झाली. त्यामुळे महिलेला सतत वेदना होत होत्या. तिला अंथरुणातून उठताही येत नव्हते. यानंतर कुटुंबीय अपोलो रुग्णालयात गेले, तेथे डॉक्टरांनी 27 जानेवारीला तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि या महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

संबंधित बातम्या : 

VIDEO : हम भी किसी से कम नहीं… म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या…

VIDEO : हे काय आक्रित घडलं? आकाशातील हजारो पक्षी जमिनीवर धडाधडा कोसळले… काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.