आजकाल प्राणी सुद्धा व्यायाम करतायत! होय खरंय, व्हिडीओ बघा
व्यायामाचा छंद मानवापुरता मर्यादित नाही, प्राणीही आपलं शरीर सडपातळ ठेवण्यासाठी मेहनत घेतात.
व्यायामामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहतं आणि सकाळी लवकर उठून व्यायाम आणि वर्कआऊट केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभर शरीरात ऊर्जा असते आणि ताजेपणा जाणवतो. उदाहरणार्थ, सकाळच्या व्यायामामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि लठ्ठपणा कमी होण्यास देखील मदत होते. सोशल मीडियावर तुम्ही व्यायामाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण कुत्रा आणि मांजर व्यायाम करताना कधी पाहिले आहेत का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्यायामाचा छंद मानवापुरता मर्यादित नाही, प्राणीही आपलं शरीर सडपातळ ठेवण्यासाठी मेहनत घेतात.
हे उदाहरण तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. जे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण येथे कुत्रा आणि मांजर ट्रेडमिलवर चालताना दिसतायत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा ट्रेडमिलवर मोठ्या आनंदाने चालताना दिसतोय. तर मांजर कुत्र्याला बघून त्यावर चालण्याचा प्रयत्न करतीये. पण तिला ट्रेडमिलवर चढता येत नाहीये.
त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की, कुत्रा ट्रेडमिलवर चालत मांजराकडे पाहतो. मांजर प्रयत्न करत असते. मग तो कुत्रा तिला मदत करतो. तिलाही तो ट्रेडमिलवर ओढतो. मांजर पुन्हा खाली पडते. पण बऱ्याच प्रयत्नानंतर मांजरीला सुद्धा जमतं! तिही कुत्र्याप्रमाणे ट्रेडमिलवर व्यायाम करताना दिसते.
Health is important, stay focused irrespective of obstacles…. pic.twitter.com/4apTclek9p
— Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) October 22, 2022
हा व्हिडिओ डॉ. सम्राट गौडा आयएफएसने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला 5000 पर्यंत व्ह्यूज मिळाले असून काही लोकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.