त्रास देणाऱ्या कुत्र्याला ‘ही’ मांजर शिकवते चांगलाच धडा! Viral video पाहा

Dog & cat funny video : कुत्रा आणि मांजरांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

त्रास देणाऱ्या कुत्र्याला 'ही' मांजर शिकवते चांगलाच धडा! Viral video पाहा
त्रास देणाऱ्या कुत्र्याला मांजरीनं घेतला चावाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 1:50 PM

Dog & cat funny video : मांजर आणि उंदीर हे जसे एकमेकांचे शत्रू मानले जातात, तसेच कुत्रा आणि मांजराच्या बाबतीतही असेच आहे. सहसा ते एकमेकांचे शत्रू मानले जातात, परंतु आजकाल या दोन प्राण्यांमध्ये मैत्री देखील पाहायला मिळत आहे. बहुतेक लोकांना कुत्रे आणि मांजर पाळणे आणि दोघांना एकत्र ठेवणे आवडते, ज्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. ते एकत्र खेळतात, फिरतात. काहीवेळा ते एकमेकांवर नाराजही होत असले, तरी त्यांचा रागही दिसून येतो. कुत्रा आणि मांजरांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल. हा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा आणि मांजर एकाच बेडवर आरामात झोपलेले दिसत आहे. त्यावेळी कुत्रा असे काही करतो, की मांजरीला रागच येतो.

कुत्र्याचा येतो राग

मांजर कुत्र्याच्या पायाजवळ पडून आहे. दरम्यान, कुत्रा अचानक विचित्र वागायला लागतो. तो शेपूट हलवायला लागतो आणि शेपूट इतक्या जोराने हलवतो, की मांजरीला त्रास होऊ लागते. कुत्र्याच्या या कृत्याने ती खूप नाराज होते, त्यानंतर ती रागात कुत्र्याचा पाय चावू लागते. कुत्र्याच्या विचित्र वागण्यावर मांजरीने त्याच्या पायाला चावा घेत त्याला धडा शिकवला.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा 11 सेकंदाचा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 39 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे.

गंमतीदार कमेंट्स

हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने गंमतीत लिहिले, की ‘बिल्कुल ऐसा ही महसूस होता है जब मसाज के नाम पर देसी नाई आपके सिर पर वार करने लगते हैं’, तर इतर अनेक यूझर्सनी हा खूपच मजेदार व्हिडिओ असल्याचे लिहिले आहे.

आणखी वाचा :

अरुंद जागेतून कार बाहेर काढण्याचा Stunt पडला महागात; पाहा, पुढे काय झालं?

Viral video : ‘हे’ सर्वजण अख्ख्या रेल्वेला का ओढत आहेत? कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल

9 महिन्यांच्या गर्भवतीप्रमाणं वाढलंय या व्यक्तीचं पोट! कशामुळे झालंय असं? ‘ही’ बातमी वाचा

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.