शेवटी आईच ती… मांजराच्या पिलाला कुशीत घेऊन कुत्रीने दूध पाजलं! पाहा व्हिडीओ
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्री आपल्या पिलांना दूध पाजताना दिसून येत आहे. यात महत्वाची आणि काहीशी आश्चर्यकारक बाब ही की, ही कुत्री आपल्या पिलांसह एका मांजरीच्या पिलालाही दूध पाजताना दिसत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्याचे अनेक व्हिडीओ (Animal Video) तुम्हाला पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ तुमच्या मनाला आनंद देऊन जातात. तसंच ते व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहण्याची तुमची इच्छा होते. माणसाचं लहान मुल असेल किंवा एखाद्या प्राण्याचं लहान पिल्लू, ते खूप गोड असतात. जे लोक त्यांची माया करतील त्यांच्याकडे ते जात असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्री आपल्या पिलांना दूध पाजताना दिसून येत आहे. यात महत्वाची आणि काहीशी आश्चर्यकारक बाब ही की, ही कुत्री आपल्या पिलांसह एका मांजरीच्या पिलालाही दूध पाजताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्री जमिनीवर झोपली आहे. तिच्या जवळ तिची पिलं असतात. हि पिलं आपल्या आईच्या कुशीत बसून दूध पित आहेत. व्हिडीओमध्ये काही सेकंदांनंतर एक मांजरीचं पिल्लूही त्या ठिकाणी येताना दिसतं. ते पिल्लू फक्त तिथे येतच नाही तर त्या कुत्रीचं दूध प्यायला सुरुवात करतं. असं असूनही ती कुत्री त्या मांजरीच्या पिलाला काहीही करत नाही आणि दूध प्यायला देते. असे व्हिडीओ आपल्याला अभावानेच पाहायला मिळतात.
View this post on Instagram
सोशल मीडिया यूजर्सकडून व्हिडीओ शेअर
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्हीही हा व्हिडीओ wildkarisma या पेजवर पाहू शकता. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. लोक हा व्हिडीओ वारंवार पाहत आहेत. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत. सोबतच हा व्हिडीओ लाईक करुन त्यावर कमेंट्सही करत आहेत.
व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स
व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो कमेंट्स आलेल्या पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘ही कुत्री किती गोड आहे. पहिल्यांदाच असं दृश्य पाहायला मिळालं’. तर दुसरा यूजर म्हणतो की, व्हिडीओ कमाल आहे. तिसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, कोण म्हणतं की प्राण्यांना भावना नसतात. हा खूप भावनिक व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत.
इतर बातम्या :