मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तर काही पक्ष्याचे असतात. प्राण्यांनी तसेच पक्ष्यांनी केलेल्या करामती या व्हिडीओमध्ये पाहण्यासारख्या असतात. सध्या तर एक विशेष व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा दिसत असून त्याने पाळत ठेवणाऱ्या एका ड्रोन कॅमेऱ्याला मोठ्या शिताफीने पाडले आहे. (Dog attack on drone video went viral on social media)
या व्हिडीओमध्ये एक ड्रोन कॅमेरा दाखवण्यात आला आहे. हा ड्रोन कॅमेरा व्हिडीओतील कुत्र्यांवर पाळत ठेवतो आहे. मात्र, याच वेळी काही कुत्रे या ड्रोन कॅमेऱ्याचा पाठलाग करत आहेत. यातीलच एका मोठ्या कुत्र्याने ड्रोन कॅमेऱ्यावर झेप घेतली आहे. तसेच मोठी झेप घेत या कुत्र्याने ड्रोनला पाडले आहे.
कुत्रे हे अनेक गुन्ह्यांमध्ये मोठ्या मोठ्या आरोपींना शोधून देण्यास मदत करतात. तसेच ते अतिशय प्रामाणिक असल्याचेही म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर सध्या हा व्हिडीओ समोर आल्यामुळे कुत्र्याच्या या धाडसाची नव्याने चर्चा होत आहे. सध्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने पाळत ठेवणाऱ्या ड्रोनला काही क्षणांत पाडले आहे.
पाहा व्हिडीओ :
Drone didn’t stand a chance. ?? pic.twitter.com/hvgpXhUvVE
— Fred Schultz (@fred035schultz) June 24, 2021
दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमके समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ Fred Schultz या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओला नेटकरी रिट्विटसुद्धा करत आहेत.
इतर बातम्या :
मौजमजा करण्यासाठी धरणावर गेले, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दोघेही जात होते वाहून, पाहा थरारक व्हिडीओ
Video | लग्न सोप्पं नसतं ! नवरी होण्यासाठी काय कष्ट घेतले ? तरुणीने कथा सांगताच व्हिडीओ व्हायरल
(Dog attack on drone video went viral on social media)