Dog Cat Fight: कुत्र्याने मांजरीला उशीखाली दाबलं आणि तो उशीवर जाऊन बसला, मांजर पण काय कमी नव्हती…पहा व्हिडीओ

जे गुण्यागोविंदाने नांदतात सुद्धा! छान भावा बहिणीसारखे हे दोन प्राणी घरात राहतात. कधी भांडतात, मारामारी करतात. असे अनेक व्हिडीओ मग सोशल मीडियावर येतात आणि ते व्हायरल होतात. काय चाललंय ते पाहूया या व्हिडीओमध्ये.

Dog Cat Fight: कुत्र्याने मांजरीला उशीखाली दाबलं आणि तो उशीवर जाऊन बसला, मांजर पण काय कमी नव्हती...पहा व्हिडीओ
Dog Cat Fight VideoImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 12:00 PM

आपले विचार, आयुष्याशी संबंधित चांगले आणि मोठे क्षण शेअर करण्यासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हिडिओ शेअरिंगचंही केंद्र बनलं आहे. दररोज सर्व प्रकारचे लाखो व्हिडिओ शेअर केले जातात. त्यातील काही भावनिक असतात, तर काही वन्यजीवनाशी जोडलेले आहेत. त्याचबरोबर काही व्हिडीओ मजेशीर असतात की जे लोकांना खूप गुदगुल्या करतात आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरलही होतात. असाच एक व्हिडिओ सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ एक डॉगी आणि मांजर यांच्यातील आहे (Dog Cat Fight Video). कुत्रा आणि मांजर एकमेकांचे वैरी मानले जातात. पण खरं हळू हळू या व्याख्या बदलायला लागल्यात. बरेचदा आपल्याला सोशल मीडियावर कुत्रं आणि मांजर छान खेळताना दिसतात. आता तर आजकाल घरात कुठला प्राणी पाळायचं झालं तर एकाला कुत्रं आवडत असतं आणि एकाला मांजर मग भांडण होऊ नये किंवा कुणी नाराज होऊ नये म्हणून कुत्रं आणि मांजर दोन्ही प्राणी पाळले जातात. जे गुण्यागोविंदाने नांदतात सुद्धा! छान भावा बहिणीसारखे हे दोन प्राणी घरात राहतात. कधी भांडतात, मारामारी करतात. असे अनेक व्हिडीओ मग सोशल मीडियावर येतात आणि ते व्हायरल होतात. काय चाललंय ते पाहूया या व्हिडीओमध्ये.

काय आहे व्हिडिओत

View this post on Instagram

A post shared by Koda huskys (@kodahuskys)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका युझरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका घराच्या सोफ्यावर एक कुत्रा आणि मांजर एकमेकांशी भांडत आहेत आणि हे भांडण मजेशीर आहे. कुत्र्याने मांजरीला सोफ्यावर टाकून उशीने झाकलं आहे. त्यानंतर तो वारंवार डब्ल्यू-डब्ल्यू ई रेसलर प्रमाणे उशीवरून उडी मारतो आणि तिला चिडवण्यासाठी वारंवार तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. हा ट्रेंड अनेक वेळा चालतो. त्यातच मांजरही कुत्र्यावर पंज्यांनी हल्ला करते. इतक्यात कुत्रा खाली उतरून खालून मांजरीवर हल्ला करू लागतो, तर मांजरही त्याला हुसकावून लावायला बघते.

लोक व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत

हा व्हिडिओ 59 सेकंदाचा आहे, मात्र लोकांना तो खूप आवडतोय. ज्या गमतीशीर पद्धतीने कुत्रे-मांजरं दिसतात, त्याचा आनंद लोक घेत आहेत. कुत्रा आणि मांजर यांच्यातलं असं भावा बहिणीचं नातं मजेशीर आहे. लोकांना या व्हिडिओचं फार कौतुक वाटतंय. व्हिडिओत पडलेल्या कुत्र्याला मांजर ज्या प्रकारे घाबरवते, तेही मजेशीर आहे.

हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला

या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 25.4 मिलियन वेळा पाहण्यात आले आहे, यावरून या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. याशिवाय वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केले जात आहे. ती आवडणाऱ्या आणि त्यावर भाष्य करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.